गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर वरध शाळेत गुणगौरव सोहळा

सहसंपादक : रामभाऊ भोयर

तालुक्यातील गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर वरध शाळेत विद्यार्थी गुणगौरव सोहळा (वार्षिक स्नेहसंमेलन)दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोज शनीवारला पार पडला
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे संस्थापक सचिव किशोर झोंटीग पाटील उदघाटक सदाशिवबापु महाजन प्रमुख पाहुणे
जयप्रकाश रागिनवार ज्ञानेश्वर डोफे उपसरपंच वरध संतोष महाजन प्रविण कळसकर पोलिस पाटील वरध दिपकराव झोंटीग इंदलभाऊ राठोड सरपंच बंदर विनोदभाऊ राठोड उपसरपंच बंदर सेवानिवृत्त मुख्याध्यापक खारकर हे होते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्वप्रथम प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मधुकर चिव्हाणे यांनी केले प्रास्ताविक भाषणात विद्यार्थीच्या अंगी कला असते परंतु ती कला सादरीकरण करण्यासाठी त्यांना व्यासपीठ हवे असते ते व्यासपीठ दरवर्षी शाळा त्या मुलांना उपलब्ध करून देतात अध्यक्षीय भाषणात किशोर पाटील झोंटीग यांनी शाळेची प्रगती ही दरवर्षी होत असते असे विचार मांडले उदघाटक सदाशिवबापु महाजन यांनी फीत कापून रितसर उदघाटन केले व कार्यक्रम सुरू झाला हा कार्यक्रम चार तास चालला या कार्यक्रमात वर्ग ६ वी ते वर्ग १२ वी पर्यंतच्या काजल राठोड चांदनी आडे शितल राठोड गायत्री राठोड नंदिनी राठोड आचल जाधव आरोशी राठोड ज्ञानेश्वरी जाधव वेदिका चव्हाण पूर्वी राठोड दिपक जाधव प्रतिषा राउत निलम सोनवणे आचल रामपुरे वैभवी राउत सपना चिकराम रोषन चिकराम नवनित अक्रडवार प्रेम गुंडकवार भोजाजी मेश्राम या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमात गणेश वंदना देशभक्ती गीत लावनी पवाडा भारुड बंजारा गोंडी कोलामी गुजराती गीते कोळी गीते अंधश्रद्धा निर्मुलन यावर नाटक बुवाबाजी यावर नाटक शेतकरी आत्महत्या यावर नाटक अशा प्रकारे भरगच्च असा कार्यक्रमाचा आस्वाद विद्यार्थी पालक गावातील नागरिक यांनी घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्य सर यांनी केले आभार डंभारे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी येडे दांडेकर देशकर गेडाम लढे गलांडे दुर्गे गेडाम गायकवाड वाढोणकर यांनी अथक परिश्रम घेतले हा कार्यक्रम पाहण्यासाठी ग्रामीण भागातून हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते