
प्रतिनिधी : प्रवीण जोशी
ढाणकी पासून जवळ असलेल्या करंजी ग्राम शाखेच्या उ.बा.ठा शिवसेना अध्यक्ष पदी माजी सरपंच रंगराव सोमेवाड यांची नुकतीच मुंबईचे उमरखेड विधान सभा संपर्क प्रमुख दशरथ मांजरेकर यांनी करंजी ग्राम शाखेच्या अध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देवून निवड केली.
अगामी काळात होवू घातलेल्या जि.प.,पं.स निवडणूकीच्या अनुषंगाने उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाची पदाधिकाऱ्याची आढावा बैठक सहस्त्रकुंड येथे विश्राम गृहावर ९ आॅगस्ट २०२३ रोजी पार पडली.
या बैठकीला यवतमाळ जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष प्रविण शिंदे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथून उमरखेड विधानसभा संपर्क प्रमुख दशरथ मांजरेकर यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उमरखेड तालुक्यातील तालुका ,जिल्हा,शहर व ग्रामीण शाखेच्या पदाधिकाऱ्याची मोठया संख्येने उपस्थिती होती.करंजी ग्राम शाखेच्या अध्यक्षाची खांदेपालट करतांना ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे करंजी गावचे माजी सरपंच रंगराव सोमेवाड यांच्या खांद्यावर अध्यक्ष पदाची धुरा जिल्हाध्यक्ष प्रविण शिंदे यांच्या शिफारशीने सोपविण्यात आली.रंगराव सोमेवाड हे कोळी समाजाचे नेतृत्व करीत असल्याने तालुक्यातील कोळी बांधवांचा सन्मान करून उ.बा.ठा शिवसेनेने ओबीसीच्या गळयात अध्यक्ष पदाची माळ घातली.रंगराव सोमेवाड हे आपल्या निवडीचे श्रेय उप तालुका सह संघटक संतोश पाटील कलाणे ,उप तालुका प्रमुख गजानन जाधव,व उप तालुका सचिव सचिन साखरे यांना देतात.
