
तालूका प्रतिनिधी :विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )
उमरखेड तालुक्यातील -ढाणकी, मेट रस्त्यावरील नाल्यावर 70ते 80लाख रुपये खर्चून बांधण्यात येणारा सिमेंट बंधारा ढाणकीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष सुरेश जयसवाल यांनी केले राष्टीय महामार्ग 752 आय अंतर्गत ढाणकी, मेट रस्त्यावरील नाल्यावर हा सिमेंट बंधारा बांधण्यात येणार आहे या बांधाऱ्याची लांबी पंधरा मीटर असून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ आहे यावेळी सिमेंट बांधाऱ्याचा कामाचा शुभारंभ नगरअध्यक्ष सुरेश जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बळवंत नाईक आनंद चंद्रे प्रकाश जयस्वाल गणेश सुधेवाड सुदर्शन रावते विष्णूदास वर्मा पुंजाराम हराळे नागेश राटोळे श्रीकांत देशमुख शंकर काळकर भारत तुपेकर दत्ता सुरोशे सांवाळेश्वरचे माजी सरपंच गणपत रावते मारोती रावते गजानन नारायण रावते डॉ.दिनेश जयस्वाल प्रेस रिपोटर नागेश महाजन, विलास राठोड उपस्थित होते
