
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील विहीरगाव परिसरात वाघाची दहशत शेतकरी शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण सविस्तर वृत्त असे गेल्या काही दिवसांपासून राळेगाव तालुक्यातील विहीरगाव सह परिसरातील शेत शिवारात पट्टेदार वाघाने धूमाकूळ घातला असून जंगल व आजूबाजूच्या गावातील नागरिक व शेतकरी भयभीत झाले आहेत.
मारेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या जंगल परिसरात काही दिवसांपूर्वी किन्ही खैरगाव विहिरगाव वाघाचे पागमार्क दिसले असून सध्या एका मोठ्या वाघाचा संचार वाढला आहे अश्यातच २५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान विहिरगांव जंगलात वाघाने शेतकरी विठ्ठल माधव कोडापे रा. विहिरगांव यांचे बैलाची शिकार करून ठार केले आहेत शिकार केल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे.
सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. असे असले तरी अभयारण्यात राहणाऱ्या इतर प्राण्यांसह मानवी जीवाचे संरक्षण होणे गरजेचे आहे.
परंतु जंगल परिसरात व लगतच्या गावातील शेत मजूर, शेतकरी, गुराखी यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाच्या भितीने मजुरवर्ग कामाला जाण्यास तयार नाही वनविभागाने त्या परिसरात वावरणाऱ्या वाघाची वेळीच बंदोबस्त करावा व येथील रहिवासी नागरिक व शेतकरी यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा येथील शेतकरी शेतमजूर वर्गांनी केली व्यक्त केली आहे.
