
फुलसावंगी (दि२८)
येथे जीवन प्राधिकरण योजने अंतर्गत सुरू असलेल्या कामाला भष्टाचाराचे ग्रहण लागले असुन १२ कोटी ची हि योजना ग्रामवासियांसाठी डोके दुखी ठरत आहे.जल जीवन योजने अंतर्गत सुरू असलेल्या या कामात अत्यंत निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात येत आहेत.या पाईप लाईनसाठी कोट्यवधी रुपयांचे पक्के सिमेंट चे रस्ते फोडण्यात आले आहेत.गावातील संपूर्ण रस्त्यांचे काँक्रीटीकरण झालेले होते.हेपक्के रस्ते मध्यभागातून फोडण्यात आले.कंत्राटदाराने गावातील एकही रस्ता पायी चालण्या लायक ठेवलेला नाही.
जलजीवन मिशन अंतर्गत अतिशय निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे यावर कोणाचेही नियंत्रण किंवा देखरेख नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या हाती केवळ काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिला आहे.यापुर्वीच्या चार वर्षांच्या कालावधीमध्ये कामाची कासव गती पाहता अख्खा तालुक्यात एकही योजना पुर्णत्वास गेलेली नाही.लोकांच्या जिव्हाळ्याची असणारी हि योजना अधिकाऱ्यांच्या” खाऊ” वृत्तीमुळे भष्टाचाराचे कुरण ठरू लागली आहे.निविदा प्रक्रिया राबविण्यापासून ते प्रत्येक्ष काम करण्या पर्यंत योजनेतील प्रत्येक घटकाने जमेल तसा पैसा हडपला असल्यामुळे दिर्घकाळ चालणारी ही योजना भविष्यात खरोखरंच पुर्णत्वास जाईल कि नाही असा प्रश्न जाणकार नागरिक विचारत आहेत.या योजनेतील निवीदा प्रक्रिया ऑनलाइन असली तरी यामध्ये एकाच व्यक्तीला अनेक कामे मिळाली आहेत.या योजनेतील कंत्राटदारांनी डमी कंत्राटदार नेमले असून अधिकारी, कर्मचारी या योजनेचे कंत्राटदार भागीदार बनले आहेत आणि हेच कर्मचारी अधिकारी कंत्राटदार म्हणून प्रत्यक्ष राबताना दिसून येत आहेत.काही आपवाद वगळता बहुतांश कंत्राटदारां जवळ करारनाम्यानुसार कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.
सदरील योजनेवर जिल्हा प्रशासन अतिशय उदासीन असल्यामुळे २०२४ पर्यंत प्रत्येक घरामध्ये शुद्ध पाणी पुरवठा मिळेल की नाही असा प्रश्न फुलसावंगी वासियांना पडलेला आहे.
