राळेगाव तालुक्यातील चाचोरा येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी


राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर

आद्य शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात चाचोरा येथे साजरी करण्यात आली.
आपल्या देशाची पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त चाचोरा येथे अंगणवाडी सेविका सौ सुधाताई ढाले यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले मालाअर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी गणेश मांदाडे, सुरज लेनगुरे राळेगाव तालुका उपाध्यक्ष मनसे, संदीप गुरनुले ( जयंती उत्सव समिती अध्यक्ष) जानकीदास वाढई, धीरज मांदाडे, सुरज चाहरे , वंदनाताई वाढई आशा सेविका, आणि सावित्रीबाई फुले जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य आणि सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.