राळेगाव येथील कपडा व्यापारी बाळकृष्ण पोपट यांच्या स्मृतीदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप आणि स्मशानभुमी स्मृतीगेट भुमीपूजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथील राधिका साडी सेंटरचे संस्थापक संचालक स्व. बाळकृष्ण पोपट यांचा आज पहिला स्मृतिदिन. त्यांचे चिरंजीव सुस्वभावी आणि दानी व्यक्तिमत्त्व संजय पोपट यांनी वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा ठरविले.आणि आज दिनांक 20/9/2024 रोजी सर्वप्रथम मार्निंग ग्रुपचे तथा बाळकृष्ण पोपट यांचे चिरंजीव संजय पोपट आणि त्यांच्या मार्निंग ग्रुपचे सदस्य यांच्या उपस्थितीत राळेगाव स्मशानभूमीत स्मृतीगेटचे विधीवत भूमिपूजन सकाळी आठ वाजता पार पडले.सोबतच त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला सौंदर्यिकरण करणार असल्याचे सांगितले.त्यानंतर राळेगाव येथील उच्च प्राथमिक शाळा, राजाबाई कन्या शाळा, शिवाजी नगर प्राथमिक शाळा व नवीन वस्ती प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना वह्या,पेन, पुस्तके यांच्या सह ईतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या दोन्ही उपक्रमामुळे राळेगाव शहरात संजय पोपट यांची वाहवा होत असून हा उपक्रम मार्निंग ग्रुप ज्या ग्रुपमुळे राळेगाव शहरात अनेक ठिकाणी वृक्षारोपणासारखे आवश्यक उपक्रम हा ग्रुप राबवित असून आवश्यक ठिकाणी हा ग्रुप शासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा निमंत्रित करत असतो. या मार्निंग ग्रुपमध्ये शहरातील पदाधिकारी, अधिकारी, व्यापारी, सेवानिवृत्त कर्मचारी या उपक्रमात सहभागी होत असून आज सुद्धा या भुमीपुजन कार्यक्रमाला नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष जानराव गिरी, कांग्रेस पक्षाचे राळेगाव शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, दानी व्यक्तिमत्त्व संजय पोपट, भारत ठुणे, प्रेम ताकसांडे, प्रशांत तोतला, गणेश राऊत, सुनील भामकर,आशिष इंगळे, बळीराम भोयर, भानुदास राऊत सर, संजय धोका, उमेश बोरा, राजू गु़ंदेजा, सपन छोरिया, अँडव्होकेट किशोर मांडवकर, सागर इंजाळकर, मिलिंद वाठोडे, प्रफुल्ल कोल्हे, किशोर सरदार, सुरेश नेहारे, विनोद नरड,,नज्जूभाई ,चारही शाळेचे शिक्षक शिक्षिका यांच्या सह अनेक मान्यवर मंडळींनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभाग घेतला. हा उपक्रम खरोखरच लहान विद्यार्थ्यांसच्या,बालगोपालाच्या आणि राळेगाव शहरवासीयांना प्रेरणा व आनंद देणारा ठरला असून सर्वत्र स्तुती केली जात आहे.