राळेगाव तालुक्यातील आटमुर्डी येथे गोठ्याला भिषण आग लागुन लाखोंचे नुकसान

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील आटमुर्डी येथे दिनांक १०/६/२४ रोजी रात्री बारा वाजताच्या दरम्यान आटमुर्डी येथील नानाजी भोकरे यांच्या गोठ्याला दिनांक १०/६/२४ रोजी रात्री बारा वाजताच्या दरम्यान साटसर्कीटमुळे गोठ्याला आग लागली असल्याने गोठ्यात ठेऊन असलेला जनावरांचा चारा कडबा,कुटार, शेतीचे साहीत्य तसेच मोटरसायकल पण जळुन खाक झाली आहे.सदर आगीची बातमी गावात पसरताच गावातील नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग विझविण्यासाठी प्रयत्न केले तर नगर पंचायत राळेगाव व यवतमाळ नगर पालिकेचे अग्निशामक वाहन बोलविण्यात आले . राळेगाव नगर पंचायतचे असं अग्निशामक वाहन व यवतमाळ वरुन अग्निशामक वाहन हे तातडीने घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण करीत आग विझविण्यात आली.पण नानाजी भोकरे यांचे मात्र ऐक शेतीच्या मशागतीच्या वेळेस लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे त्याची महसूल प्रशासन दखल घेऊन तातडीने आगीत जळून झालेले लाखो रुपयाचे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी परीसरातील नागरिकांची मागणी होत आहे.