खैरी येथे शाळा पूर्वतयारी मेळावा भाग 2: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरी चा उपक्रम)

राळेगाव तालुक्यातील खैरी येथे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यवतमाळ व पंचायत समिती राळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मुलांची शाळा खैरीचे वतीने मंगळवार ७ जुलै २०२३ ला शाळापूर्व तयारी मेळावा भाग २ घेण्यात आला. यात इयत्ता पहिलीच्या दाखल पात्र विद्यार्थ्यांच्या माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यात एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या शाळा पूर्व तयारी भाग एक मध्ये इयत्ता पहिलीत दाखल पात्र विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रगती पुस्तकाचे पाहणी करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता चाचणी घेण्यात आली.मुलांना जिल्हा परिषद शाळेत का टाकावे, आपली शाळा जिल्हा परिषद शाळा, शिक्षणाचे महत्त्व काय याविषयी विद्यार्थी व पालकांना खैरी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख श्री सुरेश कुंभलकर यांनी केले तसेच शाळापूर्व तयारी मेळाव्यात २०२२-२३ वर्ग पहिली चे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना विद्यार्थी प्रवेशाबाबत ची माहिती देण्यात आली त्यासाठी विविध स्टॉल च्या माध्यमातून(१) नाव नोंदणी वजन उंची रिपोर्ट कार्ड देणे (२) शारीरिक विकास (३) बौद्धिक विकास (४) सामाजिक व भावनात्मक विकास (५) भाषा विकास (६) गणपूर्व तयारी (७) मार्गदर्शन व साहित्य वाटप असे स्टॉल लावून माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष खुशाल वानखेडे , शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सौ वैशाली दोडके, सौ सविता ताई सवाई , सौ रीताताई निंबुळकर, शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख सुरेश कुंभलकर, प्रवीण दीडपाये, राजकुमार शिंदे, राजेंद्र दुरबुडे, शेंडे मॅडम, स्वयंसेविका योगिता धोटे यांच्यासह इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .