
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राज्यव्यापी कलावंतांची एकमेव पोलादी संघटना अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती (भारत सरकार मान्यता प्राप्त) या राज्यव्यापी कलावंत संघटनेच्या वतीने विदर्भातील तमाम महिला कलावंतांना एक सन्मानपूर्वक कलाक्षेत्रात “हक्काचा कलामंच” निर्माण करून देण्यासाठी महाराष्ट्रात सर्वात प्रथमच.. “महिला कलावंत गौरव संमेलन” येत्या 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिनांक 15 मार्च 2026 रविवार रोजी “उत्सव मंगल कार्यालय .यवतमाळ “येथे आयोजित करण्यात येत आहे…..
या ऐतिहासिक महिला कलावंत गौरव संमेलनाच्या आयोजनाची तयारी करण्यासाठी रविवार दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 1वाजता शासकीय विश्रामगृह, यवतमाळ, जि. यवतमाळ याठिकाणी || महिला कलावंत गौरव संमेलन आढावा बैठक || आयोजित करण्यात आली होती….
तरी अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती च्या प्रमुख “क्रियाशील सभासद” आणि विदर्भ महिला कलावंत गौरव संमेलनामध्ये “संयोजक” म्हणून संयोजन कमिटी मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या मान्यवरांनी या बैठकीला आवर्जून बहुसंख्येने उपस्थित दाखवली प्रमुख उपस्थितीत मा. गायक-सोमनाथ गायकवाड*
संस्थापक अध्यक्ष
अखिल भारतीय कलावंत न्याय हक्क समिती त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली बैठकीचे आयोजन
गायिका सौ. शितलताई लाड*
जिल्हाध्यक्ष श्री अविनाशजी बनसोड* व यवतमाळ जिल्हा संघटक श्री. अशोकजी उमरतकर* कराओके संगीत टीमचे श्रीयुत नानावटे , गुरुदेव सेवा मंडळाचे मधुकर कोवे
श्रीकांत माळवी सर ह्यानी सहभाग दर्शविला. अ. भा. कलावंत न्याय हक्क समिती . महिला सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
