सुरदेवी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला, जीवितहानी टळली,

नागपूर कडून हैदराबाद कडे जाणारा कंटेनर क्रं एच आर 58 सी 3010 च्या चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने सदर कंटेनर रस्त्याचा कडेला जाऊन फसला, ही घटना केळापूर तालुक्यातील सुरदेवी गावाजवळ दिनांक 7 जुलै रोजी मध्यरात्री अंदाजे चारच्या दरम्यान घडली. या अपघातात कोणतीच जीवितहानी झाली नसून अधिक तपास करंजी महामार्ग पोलीस करीत असल्याची माहिती आज द पोलिसांमार्फत देण्यात आली आहे.