
सहसंपादक : रामभाऊ भोयर
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ हा शिक्षकांच्या समस्या प्रती सुरवातीपासूनच जागरूक असून आता मात्र शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून याच अनुषंगाने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे सर हे १ सप्टेंबर व २ सप्टेंबरला यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर येत असून येताना सकाळी १० वाजता नेरपरसोपंत येथे पोहचणार असून दुपारी २ वाजेपर्यंत शहरातील शाळांना सदिच्छा भेटी देऊन मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्या जाणून घेतील सोबतच मांगलादेवी येथील शाळेला सदिच्छा भेट देऊन यवतमाळ येथे पोहचणार असून दुपारी ४ वाजता शिक्षणाधिकारी माध्यमिक, लेखाधिकारी शिक्षण,वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक यांच्या कार्यालयात जाऊन मागील कामाचा आढावा घेणार असून रात्रीच्या यवतमाळ मुक्कामानंतर शनिवारी सकाळी ९ते १२ वाजेपर्यंत यवतमाळातील शाळांना सदिच्छा भेटी देणार असून या दौऱ्यात प्रांतीकच्या ईतर पदाधिकाऱ्यासोबतच यांचे सह यवतमाळ जिल्हा पदाधिकारी अध्यक्ष अशफाक खान, जिल्हा कार्यवाह रामकृष्ण जिवतोडे, जिल्हा कार्याध्यक्ष विजय खरोडे, जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जिरापूरे , सहकार्यवाह आनंद मेश्राम यांच्या सह अनेक जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष श्रावनसिंग वडते सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
