लम्पी स्कीन डिसिज या आजाराचे रिधोरा येथे लसीकरण

राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील सरपंच उमेश गौऊळकार , डॉक्टर औंधकर, सचिव पंढरीनाथ खडसे यांच्या पुढाकाराने ३१ आगस्ट रोजी लम्पी स्किन डिसिज या आजाराचे. लसीकरण जनावरांना करण्यात आले व गोचुड,गोमाशा निर्मूलन प्रतिबंधक फवारणी करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे. लम्पी स्किन डिसिज हा रोग १९२९ पासून – १९७८ पर्यंत मुख्यतत्त्वे आफ्रिकेत आढळला होता. नंतर हळुवारपणे या रोगाने सभोवतालच्या इतर देशात शिरकाव केला. मात्र सण २०१३ नंतर वेगाने या रोगाचा सर्व दूर प्रसार होत आहे. आणि आता हा रोग अनेक युरोपिया व आशिया देशात पसरला आहे. भारतात सदर रोगाची पहिली नोंद अगस्ट २०१९ मध्ये ओरिसा राज्यात झाली नंतर झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका व केरळ राज्यात या आजाराचा शिरगाव झालेला आढळून आला. महाराष्ट्रात या आजाराचा प्रसार गडचिरोली जिल्ह्यात (सिरोंचा) मार्च २०२० महिन्यापासून झालेला दिसून आला आहे. तेथील सात रोगाचे पक्के निदान भोपाळ येथील राष्ट्रीय रोग निदान प्रयोगशाळेत झाले आहे. या रोगाचे मुख्य लक्षण जंतु- देवी विषाणू गटातील कॅप्रीफॉक्स प्रवर्ग गाई, बैल, मसी मध्ये मुख्यत्व आढळतो शिळ्यामेंढ्यात अजिबात हा रोग होत नाही.असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.तर रिधोरा येथील शेतकऱ्यांना राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत ग्रामीण शेळी मेंढी पालनासाठी मार्गदर्शन पर माहिती देण्यात आली. सदर शासनाच्या येणाऱ्या योजना म्हणजे शेळी मेंढी पालनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान पुढीलप्रमाणे आहे. शंभर शेळ्या पाच बोकुड असे २० लाख रुपये तर दोनशे शिळ्या अधिक दहा बोकड 40 लाख रुपये तर ३०० शेळ्या अधिक पंधरा बोकुड ६० लाख रुपये तर चारशे शिळ्या २० बोकुड 80 लाख रुपये तर ५०० शेळ्या 25 बोकुड एक कोटी रुपये तर वराह पालन पन्नास मादी पाच नर ३० लाख रुपये तर पशुखाद्य वैरण विकास योजनेअंतर्गत मूरघास तयार करणे, केल तयार करणे, वैरण विटा तयार करणे असे वरिल सर्व योजना ५० टक्के अनुदानावर या योजना राबविण्यात येत आहे. सदर या योजनेचा लाभ शेतकरी शेतमजूर यांनी घ्यावा असे आव्हान डॉक्टर औंधकर सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी वाढोणा बाजार यांनी केले आहे. या कार्यक्रमाला गावातील प्रथम नागरिक सरपंच उमेश गौऊळकार, डॉक्टर औंधकर, डॉक्टर पंकज संतोष राठोड, डॉक्टर जगदीश गणेश राठोड, डॉक्टर प्रनव आस्टोकार सचिव पंढरीनाथ खडसे, सोसायटी संचालक दिपक पवार , ग्रामपंचायत कर्मचारी भास्कर तोडासे, राजू पंडिले व गावातील शेतकरी शेतमजूर उपस्थित होते