
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
सद्यस्थितीत तूर आणि हरभऱ्याला खुल्या बाजारामध्ये भाव नसल्याने व नाफेड काहीसा समाधानकारक भाव देत असल्याने शेतकऱ्यांना कडधान्य भावाच्या पडत्या काळामध्ये नाफेड चा आधार झालेला आहे .हंगामाच्या सुरुवातीला तुरीला 9000 रुपयांपर्यंत सन्मान जनक भाव होता पण तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या तुर निघायच्या होत्या जशा शेतकऱ्यांच्या तुरी घरी आल्या तसेच तुरीचे भाव गडगडायला सुरवात झाली तुरीचे भाव हे क्विंटल मागे सात हजार रुपयापर्यंत खाली आले नऊ हजार रुपये क्विंटल वर असलेले भाव 7000 रुपयावर आल्याने शेतकऱ्यांचे धाबे दणाणले होते पण अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना नाफेडचा मोठा आधार झाला कारण नाफेड शेतकऱ्यांना तुरीसाठी क्विंटलमागे आठ हजार रुपये दर देते त्यामुळे जवळपास साडेतीनशे शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी खरेदी विक्री संघाकडे नोंदणी केली त्यातील आजतागायत 141 शेतकऱ्यांनी नाफेडला आपल्या तुरी विकल्या 141 शेतकऱ्यांच्या 2036 क्विंटल तुरी नाफेडणे खरेदी केल्या काही शेतकऱ्यांचा माल अजून घेणे बाकी आहेत पण तो सुद्धा नाफेड खरेदी करेल नाफेड च्या माध्यमातून तुरीची खरेदी सुरू असताना बारदाण्याची कुठलीही अडचण आली नाही पुरेसा बारदाना आहेत तसेच विकलेल्या तुरीचे पेमेंट सुद्धा आठ ते दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना मिळत आहेत नाफेडच्या नियमानुसार ही खरेदी विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली खरेदी विक्री संघ करीत आहेत खरेदी विक्री संघाचे सभापती मिलिंद इंगोले व व्यवस्थापक संजय जुमडे यांच्या मार्गदर्शनात खरेदी विक्री संघाचे कर्मचारी हे काम पाहत आहेत तुरीप्रमाणेच हरभरा विक्रीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना नाफेड चा आधार झाला आहे सद्यस्थितीत खुल्या बाजारामध्ये हरभरा 5000 रुपये क्विंटल च्या दराने विकला जात आहे नाफेड मध्ये याच हरभऱ्याला 5875 रुपये प्रतिक्विंटल दर मिळणार आहे निश्चितच खुल्या बाजारापेक्षा जास्त दर नाफेड शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला देणार आहेत हरभऱ्याची नोंदणी सुद्धा खरेदी विक्री संघामध्ये सुरू आहे येत्या काही दिवसात नाफेडच्या माध्यमातून खरेदी विक्री संघ हरभऱ्याची खरेदी सुरू करेल खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांच्या तूर आणि हरभऱ्याला मातीमोल भाव असताना नाफेड काही प्रमाणात का असेना शेतकऱ्यांच्या तूर हरभऱ्याला सन्मानजणक भाव देत असल्याने निश्चितच अशा काळामध्ये शेतकऱ्यांना नाफेडचा आधार झालेला आहे
