
सहसंपादक : रामभाऊ भोयर
तालुक्यातील धानोरा येथील बौद्ध उपासक उपासाकाच्या वतीने पै पै पैसा गोळा करून अनेक वर्षापासून असलेली अपेक्षा पूर्ण करत सम्राट अशोक जयंतीच्या दिवशी धानोरा येथे आठ फूट उंचीचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्या उभारण्यात आला आहे .
धानोरा येथे अल्प संख्या असलेल्या बौद्ध उपासक उपासकानी शासकीय निधीवर अवलंबून न राहता पै पै पैसा गोळा करून अनेक वर्षाचे स्वप्न पूर्ण करून त्यांनी लाखो रुपयाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गावात उभारला असून हा उभारलेला पुतळा केवळ एक स्मारक नसून तो समता स्,वातंत्र्य आणि बंधुतेचे प्रतिक म्हणून याकडे पाहिले जाणार आहे त्यामुळे या गावातील बौद्ध उपासक उपासकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्या उभारल्याने सर्वत्र बौद्ध उपासक उपासिकांचे कौतुक होतं असून पुतळा उभारणी करिता गावातील बाळक्रीष्णा बाई कांबळे, नंदकिशोर भोंगाडे, प्रवीण थूल,आकाश मून, त्रिशरण जवादे,प्रकाश मुन, तेजस थूल, अमित थूल, बंटी लाभाने स्वरित लमाने, संदेश धुपे विनोद धुपे ,प्रशिक मुन,उमेश भलावी आदित्य भोंगाडे,शुद्ध धन भोंगाडे,हर्षवर्धन वावरे संदिपान जवादे श्रीकांत जवादे, आदींनी पथक परिश्रम घेतले
