
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथील हृदय सागर इंझळकर
आर.एम.इंटरनॅशनल स्कुल राळेगाव येथे शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्याने देश व राज्य पातळीवर गुणवत्तापूर्ण कामगिरी नोंदवली आहे.
सायन्स ऑलिम्पियाड फौंडेशन मार्फत इयत्ता 4 थी साठी घेण्यात आलेल्या इंटरनॅशनल मॅथेमेटिक्स ऑलिम्पियाडच्या सेकंड राऊंड मध्ये 36/40 स्कोर घेऊन उत्तुंग यश त्याने प्राप्त केले . त्याचा इंटरनॅशनल रँक हा 463 आलेला आहे. मागील वर्षी सुद्धा त्याने 39/40स्कोर घेऊन इंटरनॅशनल रँक घेतलेला होता हे विशेष
या यशा सोबतच इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड मार्फत घेण्यात आलेल्या मॅथेमॅटिक्स ऑलिम्पियाड मध्ये सुद्धा हृदय ने इंडियन रँक 5 घेऊन महाराष्ट्र स्टेट मध्ये अव्वल येऊन स्टेट टॉपर ठरलेला आहे. असे यश प्राप्त केलेला राळेगाव मधील तो पहिला विद्यार्थी ठरलेला आहे.यासाठी त्याला इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड मार्फत स्कॉलरशिप सुद्धा देय झालेली आहे. या यशा बाबत सर्वत्र हृदय चे कौतुक होत असून त्याने या यशाचे श्रेय मार्गदर्शक,गुरुजन , आई वडील व कुटुंबाला दिले .
