
पोंभूर्णा तालूका प्रतिनीधी:- आशिष नैताम
पोंभूर्णा तालुक्यातील चकहत्तीबोळी परीसरातील विद्यूत खांबावर विजेचे काम करीत असतांना अचानक विजपुरवठा सुरु झाल्याने एका तरुन लाईनमॅनला आपला जीव गमवावा लागला सदर घटना दिनांक २२/१०/२०२२ रोज शनिवारला दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली या घटणेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे मृत्यु झालेल्या लाईनमॅनचे नाव दिपक पेंदाम वय साधारणता ३५ वर्ष असून त्यांच्या मागे आई, पत्नी व लहान दोन मुली आहेत काळाने दिपक पेंदाम यांच्या डोक्यावरून वडीलाचे छत्र हिरावले आई वडिलांना ते एकुलते एक असल्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी यांच्यावर होती त्यांचा मुळ गाव खेळी तालुका मुल जि. चंप्रपूर हे असून ते एम.एस. ई. बी. पोंभूर्णा येथे नौकरीला होते त्यातूनच त्यांच्या कुटुबांचा ऊदर निर्वाह होत होता मात्र नियतीने काहि वेगळचं लिहल होतं नेहमीप्रमाणे ते आपल्या कर्तव्यावर असतांना अचानक आज काळाने घाला घातला आणि त्यांची प्राणज्योत मावळली अत्यंत प्रेमळ मणमिळाऊ स्वभावाने ते परीसरातील नागरीकांना आपलसं केले मात्र चांगली मानसंच देवाला प्रिय असतात याची आज प्रचिती आली घटनेची माहीती मिळताच विद्यूत विभागाचे कर्मचारी व पोलीस अधिकारी यांनी घटणा स्थळी दाखल झाले पोलीसांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्नालय पोंभूर्णा येथे पाठविण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोंभूर्णा पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री. जोशी सर आणि त्यांची टिम करीत आहे
