
बिटरगांव (बु) प्रतिनिधी// शेख रमजान
ढाणकी शहरात मागील काही दिवसा पासून गुप्तधन काढन्याचे प्रमाण वाढले असून . अश्यात दि.10/05/2024 रोजी चे अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त पाहून काही लोक गुप्तधन काढत आहे अशी माहिती बिटरगाव पोलिसांना मिळाली यावर बिटरगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार प्रेमकुमार केदार यांनी बातमीची खात्री करून गणेश मामीलावाड यांच्या शेतात छापा टाकून जीवन गोविंद जाधव वय (25 )रा. टेंभुरदरा, संतोष हरीसिंग राठोड वय( 48) रा बाळदी, अभिजीत गणेश मामीलवाड वय (25) रा ढाणकी,सर्वजीत कांनबा गंगनपाड वय( 25 )रा ढाणकी आणि पंडित विश्वनाथ राठोड वय (45)रा चिल्ली. सर्व रा.ता उमरखेड जि यवतमाळ यांना ताब्यात घेऊन त्यांचेकडून पाच मोबाईल एकूण किंमत 28000रु व तीन मोटरसायकल किंमत- 120000 रु , डीप सर्च मेटल डिटेक्टर किंमत 60000रु व एक थापीच्या आकाराचा चाकू किंमत 500 रुपये असा एकूण 208500 -रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरून दत्ता कुसराम यांचे फिर्याद वरून वरील आरोपी विरुद्ध अपराध न.184/24 कलम 3(2)3(3) महाराष्ट्री नरबळी आणि इतर अमानुष्य अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013 प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला सदर ची कारवाही पोलीस अधिक्षक साहेब यवतमाळ, अपर पोलीस अधिक्षक यवतमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड यांचे मार्गदर्शनात ठाणेदार प्रेमकुमार केदार, पो हे कॉ रवी गिते, पोलीस नायक गजानन खरात,पो कॉ , निलेश भालेराव, अंबादास गारुळे, प्रवीण जाधव, प्रकाश मुंढे, चालक मंगेश हुलगुंडे यांनी केली पुढील तपास वरिष्ठयांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय साळुंके पोलीस स्टेशन उमरखेड करत आहेत
