
सहसंपादक : रामभाऊ भोयर
दिनांक.२६.३.२०२६ ला ,दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील राळेगाव शहरात प्रभु श्रीराम नवमी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळेस मुख्यतःआगळी वेगळी शोभायात्रा काढ़ण्यात आली.या शोभायात्रेत श्रीराम दरबार झाँकी राधा कृष्ण झाँकी मुख्य आकर्षण ,बाल हनुमान तयार करण्यात आले होते .श्रीराम दरबार झाँकी साठी मुलं उत्साहाने आपली नावे देत होती.या धर्म कार्यात तरुण पिढ़ी उत्साहाने सहभागी झाले होते.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी क्रांती चौक येथुन महाआरती व बाईक रॅली ने झाली.लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा,महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, प्रश्न मंजुषा इत्यादी चे आयोजन करण्यात आले होते.विशेष दुर्गा वाहिनीच्या दुर्गांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले.त्यांचा कलेचा देखावा आकार्षक होता.श्रीराम दरबार झाँकी साठी मुख्य पात्र श्रीराम – रोहित चंदु शिवणकर,सितामाता-कु.श्रध्दा अशोक कोल्हे ,लक्ष्मन-मोहीत, हनुमान -आलोक सोनी.बाल हनुमान कलाकार ह्या वेळी दोघे जन होते.तसेच कृष्णा-,राधा-कु.क्षीरसागर,
शोभायात्रेची सुरुवात श्रीरामाच्या पालखीचे पुजन करुन झाले.ह्यावेळी कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालक मंत्री चंद्रपुर जिल्हा मा.डॉ.प्रा.अशोक उइके,मा. तहसीलदार भोईटे सर,राळेगाव पोलीस स्टेशन चे मा.दंदे सर,मा.बोरकर सर, मा.नगराध्यक्ष रवींद्र शेराम,मा.नगर उपाध्यक्ष जानराव गिरी,मा.तालुका संघ चालक भुपेंद्र कारिया, भाजपा जि.अध्यक्ष मा.अँड प्रफुल चौहान,राम मंदीर अध्यक्ष मा.अनिल वर्मा,मेघश्याम चांदे,बाळु भाऊ धुमाळ,गोपाल मश्रु,राजनारायण वर्मा, अँड.प्रितेश वर्मा,संदीप पेंदोर,प्रकाश खुड़संगे,जिवन खंगन, डॉ.अशोक थोड़गे,पटैलपैक,अशोक कोल्हे,शुभम् मुके, डॉ.कुणाल भोयर,सागर वर्मा,विनोद क्षीरसागर,बजरंग दलाचे मा.जगदीश निकोड़े,सुरेश गहरवाल,संजय कारिया,सुमित कुंड़,सुरेंद्र गुंदेचा, संजय इंगळे,निलय घिणमिने,पवन वर्मा,चेतन वर्मा..रांगोळी परिक्षक डॉ.आश्वीनी ताई थोड़गे,सौ.स्वातीताई निंबुळकर,सौ.भावना ताई खंगन सौ.पुनमताई क्षीरसागर, सौ.अर्चनाताई क्षीरसागर,सौ.मंगलाताई धोटे,सौ.छायाताई पिंपरे,श्रीमती सविता ताई पोटदुखे,शोभाताई इंगोले,श्रीमती भोयर काकु,सौ.यमुनाताई,सौ.शितलताई राऊत,मोठ्या प्रमाणांत जन समुदाय,श्रीराम भक्त उपस्थित होते… या वेळी श्रीरामाच्या पालखीचे पुजन व दर्शन ठिक ठिकाणी लोक मोठ्या उत्साहाने करित होते.चौका चौकात,रांगोळी,सजावट आणि या भव्य शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.मोठ्या उत्साहाने विविध ठिकाणच्या भजन मंड़ळी,लेझीम,नृत्य …सगळी कड़े मोठया,जल्लोषात, शांततेने श्रीराम नवमी साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे दिशा निर्देश आयोजक समितीनी देऊन, सुव्यवस्थेचा उत्तम उदाहरण या वेळेस श्रीराम नवमी उत्सव समितीच्या कार्यामुळे निदर्शनास आले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन संदीप पेंदोर,समारोप बक्षीस वितरण करुन आणि सगळ्यांचे आभार गोपाल भाऊ मश्रु,प्रितेशजी वर्मा यांनी केले.राळेगाव पोलीस बल मोठ्या प्रमाणात सहकार्य केले.विशेष या सुंदर श्रीराम दरबार झाकी सजावट मैढ़ क्षत्रिय स्वर्णकार समाजाच्या महाराष्ट्र प्रान्त अध्यक्षा/ट्रस्टी सौ.संतोषीताई वर्मा आणि राजनारायण वर्मा यांनी केले.
एक विशेष सत्कार ह्या श्रीराम नवमी निमित्त श्रीराम मंदीर येथे,मातृशक्ती समिती सौ.भावनाताई खंगन व सौ.संतोषी ताई वर्मा तर्फे करण्यात आले.सामाजिक आणि सनातन संस्कृतीला नेहमी मदत करणारे ,मातृ शक्तींना प्रोत्साहन देणारे आदरनिय मेघश्याम चांदे (मामा),सामाजिक कार्यात सदैव प्रयत्नशील मोठे भाऊ गोपाल मश्रु,सनातन संस्कृतीला साजेसे अँड.प्रतेश वर्मा ह्या तिघांचे शॉल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
