ऋतुचक्र मानानुसार आपला असर दाखविणारी खापर कवेलूची घरे होत आहेत विलुप्त


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


पर्जन्यवृष्टी झाल्यानंतर शेतीचे कामे सुरू होतात याला अनुसरून घराच्या डागडूजीचे काम हाती घेतल्या जाते यामध्ये कवेलू व खापराची घरे जनावरासाठी व शेतकरी स्वतःला राहण्यासाठी बांधतच असतो त्या ठिकाणची सुद्धा दुरुस्ती केल्या जाते अशा दुरुस्तीचे कामे शेतकरी हाती घेतात.मृग नक्षत्राचा पहिला दमदार पाऊस पडल्यानंतर ही कामे वेगाने हाती घेऊन ती युद्धपातळीवर पूर्ण करतात. त्यामुळे ही कामे करणाऱ्या असंख्य मजुराला व कारागिराला एक प्रकारचे आर्थिक प्राप्तीचे स्रोत होते परंतु आधुनिक काळात वावरत असताना खापराची आणि कवेलूचे घरे उरली नाही काही बोटावर मोजण्या इतकी ही घर कुठे कुठे दिसतात की ज्या व्यक्तींना अशा घरात राहायला आवडते किंवा त्याचे महत्त्व त्यांना माहित आहे.

सद्यस्थितीत कवेलू आणि खापराची घर जनावरांची पावसाळ्यातील सुरक्षितता म्हणून उपयोग होत असे ते सुद्धा आता राहिले नाही त्यामुळे याची दुरुस्ती करणारे कारागीर उरले नाही आणि जे आहेत त्यांचे भाव सुद्धा गगनाला भिडले आहे. शहराच्या ठिकाणी सगळीकडे सिमेंटचे घरी झाले आहे तशी घरी आता गावखेड्यात सुद्धा होताना आपल्याला दिसत आहेत पण ज्यांना ही घरे परवडत नाही अशा व्यक्ती कवेलु खापराची घरे बनवतात. घर बनवण्यासाठी लोखंड आणि सिमेंट व लोखंडी पत्र्याचा वापर करतात परिनामी प्रत्येक ऋतूमध्ये किंवा वातावरणाला अनुसरून आपला आसर दाखवणारी कवेलू खापराच्या घराची संख्या कमी झाली पावसाळा सुरू होण्यापूर्वी किंवा नादुरुस्त झाल्यानंतर दुरुस्ती करणारी काही खासमखास व तरबेज असणारा मजूर वर्ग होता. पण ही मंडळी सुद्धा राहिली नाही ज्यांना कवेलू खापराच्या घराची दुरुस्ती करता येत होती त्यांच्यासाठी एक व्यवसाय तर बनला होता शिवाय मुख्य उदरनिर्वाहा चे साधन सुद्धा बनले होते आणि अशी घर बनवण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी काही मजूर गुत्तेदारी प्रमाणे काम घेत असत आणि अनेक ठिकाणी काम मिळून देणारा त्यांचा मुकादम सुद्धा असायचा तसेच कवेलू दुरुस्तीचे काम हे सूर्योदय होण्याच्या आधी सुरू होत असत व पहिले एकत्रित कुटुंब पद्धती अस्तित्वात होती त्यामुळे अनेक घरी मोठी असल्यामुळे ही कामे तीन ते चार दिवस चालायचे.

            

चौकट
मागील काही वर्षात सिमेंट काँक्रेट ची घर बनवीण्याकडे लोकांचा कल आहे त्यामुळे जुन्या कवेलूच्या घराकडे दुर्लक्ष होत आहे त्याला पर्याय म्हणून आता लोखंडाच्या स्वरूपातील पत्रे स्लॅब चे घरामुळे कवेलूच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्याचे व्यवसाय मात्र ठप्प झाले तसेच अनेक जण खापर आणि कवेलू ची निर्मिती करून आपला उदरनिर्वाह करत होते त्याच्या व्यवसायला कुठेतरी ब्रेक लागल्याचे चित्र आहे.
दिगंबर रावते पाटील
प्रगतिशील शेतकरी