ढाणकी शहरात असलेल्या मल्टीस्टेट पतसंस्था वाल्यांची शहरांप्रती सामाजिक बांधिलकी किती…??


प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी


अधिक व्याजदर रकमेला माखून ग्राहकाला आमिष मोठ्या प्रमाणात दाखवायचे आणि रक्कम जमा करून हवा तसा मनसोक्तपणे पैसा वापरायचा आणि ज्यावेळी प्रकरण अंगलट येईल त्या क्षणी पळून जायचे शिखंडी व्हायचे! या विदूषकांचे सगळे डावपेच ढाणकी शहरातील जनतेने ओळखले पण वेळ निघून गेल्यावर? ग्राहक आता मृत्यूच्या शय्ये प्रमाणे या लुटारु, गद्दार,धोकेबाज, लफंडरा कडे बघत आहेत. वाढदिवस असल्यास शुभेच्छा द्यायच्या मंगल आणि इतर प्रसंगात सहभागी व्हायचे तत्सम मोबाईलला स्टेटस ठेवायचे आपल्या स्वार्थासाठी सहभागी होऊन येणाऱ्या काळात ठेव मागता येईल असे त्या मागील प्रयोजन असावे शहरातील मल्टीस्टेट यंत्रणेवर सर्वसामान्यांचा विश्वास राहिलेला नाही विश्वास कायम करायचा असल्यास प्रसंगी एखादी सभा घेऊन वार्षिक ताळेबंद अहवाल यांनी सर्वसामान्यांच्या पटलावर ठेवायला पाहिजे त्यामध्ये सर्व प्रकारच्या ठेवीची माहिती ग्राहकांना द्यायला पाहिजे मल्टीस्टेट वाल्यांचा सामाजिक मंच असून तो अनेक समाजाला पोषक असे उपक्रम राबवितात असे समजले पण ढाणकी शहरात भीषण पाणीटंचाई असताना कधी ते मंच सामाजिक काम करते त्याचे फलक लावून शहरातील प्रभागांमध्ये त्यांचे वाहन पाणी वाटताना दिसले नाही होतकरू विद्यार्थ्याला शालेय साहित्याची मदत करून वेळप्रसंगी आर्थिक मदत करताना कोणताही मंच दिसला नाही मग मल्टीस्टेट वाल्यांनी ढाणकी शहरात येऊन ठेव जमा करायची मोठ्या प्रमाणात रक्कमेला व्याज आकारून अनेक कागदाची पूर्तता केल्यानंतर कर्ज देऊन शोषण करायचे एवढेच ठरवले का? मागील काही दिवसांपूर्वी व्हाट्सअप ग्रुप वर एका गरजू रुग्णाला मदत हवी असताना सर्वसामान्य लोकांनी जे घडले ते दिले व मदत केली पण ही लुटारू यंत्रना मदत करताना दिसली नाही. व तसे असल्यास त्यांनी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दरवर्षी शहरवासीया यांच्यासमोर मांडताना दिसले नाही व्यापारी धोरण आखून ही मंडळी शहरांमध्ये आली. ज्या ठिकाणी फसवणूक झाली त्यांनी फक्त गोरगरीबांनी गुंतवनुक केलेल्या रक्कमे विषयी बोलावे व ती त्यांना तात्काळ परत केली पाहिजे. सर्वसामान्यांनी सुद्धा त्यांना होत असलेल्या शारीरिक आर्थिक व मानसिक त्रासाची जाण ठेवूनच गुंतवणूक करावी व या लुटारू यंत्रणेपासून दूर राहावे..तर ज्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे त्या ठिकाणचे चेले चपाटे म्हणतात जेवढी रक्कम आमच्या संगणकाला आहे तेवढी आम्ही देतो ना ..पण एवढी फसवणूक झालेली असताना त्यांना हे सांगताना थोडी पण लाज वाटू नये पुस्तकात आणि संगणकामधील रकमेत तफावत असताना खऱ्या अर्थाने ग्राहक खूप संयमी म्हणावे लागतील.