
.
प्रतीनिधी :प्रवीण जोशी ,ढाणकी
ढाणकी येथे मिरवणुकीला एकूण 11 दुर्गा मंडळ होते. दुर्गा मातेला निरोप देण्यासाठी दुर्गा भक्ताच्या, एकीकडे डोळ्यात अश्रू तर,दुसरीकडे जलोष, दुर्गा माता मंडपात दहा दिवस उठणे ,बसणे विविध विषयांवर चर्चा विनिमिय, डेकोरेशन,सजावट, पुज्या आरती विविध कार्यक्रम, उत्सवाचे दिवस कुणीकडे गेले कळलेच नाही. आणि दसरा हा सण पार पडल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी वेळ आपल्या जगतजननीला वसुदेला अर्थातच अंबाबाईला निरोप देण्याची वेळ होती. आज त्या मंडपातली दुर्गा मातेची शेवटची आरती झाली अन् डोळे पाणावले आरती संपली , दुर्गा माता की जय, बोल भवानी की जय, पुढच्या वर्षी लवकर या कंठ दाटलेल्या आवाजात दुर्गा भक्ताचा आवाज निघत होते.पूजा आरती झाल्या नंतर वाजत गाजत ,ढोल ताश्याच्या आवाजात सर्व दुर्गा मंडळ आठवडी बाजार येथे जमले ,तिथून गावातील मुख्य मिरवणुक मार्गाने मिरवणुक सुरू झाली. दोन वर्षाच्या महामारीच्याकाळात कोणतेही उत्सव, मिरवणुक न जमल्या कारणाने या वर्षी दुर्गा मातेच्या भक्तात उत्साह जास्तच पहावयास मिळाला.वरून आभाळ दाटलेले, पाऊस सुरू असताना पण दुर्गा भक्त धूम धडाक्यात आपआपल्या मंडळा पुढे ढोल ताशे, डिजे,यांच्या तालात आनंदाने नाचत होते. मिरवणुकीत कोणत्याही समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ नये खबरदारी मनून चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता,तसेच सर्व दुर्गा मंडळांनी याची खबरदारी घेतलेली दिसून आली. गावातीलनेतेमंडळी ,समाजसेवक,शांतता कमिटी सदस्य,पत्रकार संघ,वरिष्ठ मंडळी ,पोलिस प्रशासन यांनी मोलांची कामगिरी बजावत अतिशय शांततेत मिरवणुक पार पडावी म्हणून मोलाचे सहकार्य केले बीटरगाव पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप बोस,उपनिरीक्षक कपिल मस्के,व संपूर्ण पोलिस प्रशासन यांनी मोलाची कामगिरी बजावली त्यामुळे संपूर्ण दुर्गा मंडळ व गावातील लोकांनकडून अधिक उत्साहाचे वातावरण पहावयास मिळाले.अशा प्रकारे अतिशय शांततेत मिरवणुक पार पडली. दुर्गा विसर्जन गांजेगाव येथील पैनगंगा नदीत करण्यात आले.