तहसीलदार डॉ रविंद्र कानडजे यांची मृतक वारसांच्या कुटुंबांना सात्वन भेट

राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर

१५ सप्टेंबर राळेगाव तालुक्यातील
पळसकुंड येथील शेतकरी विज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ सप्टेंबर रोजी घडली होती. सविस्तर वृत्त असे
राळेगाव तालुक्यात वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती तर वीजेच्या कडकडाटासह सरू असलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातल्याने अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली असून सदर पळसकुंड येथील शेतकरी देवीदास नागोराव गेडाम ४५ या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पळसकुंड येथील घडली आहे सदर त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट म्हणून तालुक्यातील कर्तव्य दक्ष तहसीलदार रविंद्र कनडाजे, मंडळ अधिकारी सापान, किन्नाके मॅडम, व महसूल विभागाच्या चम्मुने मृतक देवीदास गेडाम यांच्या कुटुंबाची भेट घेऊन धीर दिली आहे. सदर सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन डॉ रविंद्र कानडजे तहसीलदार यांनी पीडित कुटुंबाला दिले. त्यामुळे कुटिबीयांनी व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.सदर घरातील कर्ता पुरुष निघून गेल्याने गेडाम परीवारावर मोठा दुखाचा डोंगर कोस़ळला आहे त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी आणि म्हातारी आई असा बराच आप्त परीवार आहे.