
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिधोरा बस स्टँड जवळ भीषण अपघातात दुचाकी सवार प्रमोद मारुती वाढंई वय अंदाजे ४० वर्ष रा.रिधोरा असे या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव असून १८ मे रोजी ५ च्या दरम्यान वाढोणा बाजार कडून आपल्या दुचाकीने दुचाकी क्रमांक एम एच २९ बी झेड १९६५ या गाडीने आपल्या गावाकडे येत असताना रिधोरा बस स्टैंड वरून गावाकडे रस्ता क्रॉस करतेवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एम. एच. ३० बी डब्ल्यू ४८६२ या किया गाडीने प्रमोद मारुती वाढंई याला जबर धडक दिल्याने हा जागीच मृत्यू पावला आहे या घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनला मिळताच वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे , आकाश कद्दूसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार करत आहे. सदर प्रमोद यांच्या पश्चात आई-वडील पत्नी व दोन मुलं असा आत्ता परिवार असून त्यांच्या जाण्याने रिधोरासह परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे
