खैरी (चौरस्ता) ते खैरी गावात जाणाऱ्या रस्ता व नालीचे काम निकृष्ठ
(बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मनसेची मागणी)

सहसंपादक : रामभाऊ भोयर

सिमेंट काँक्रिटच्या रस्ता व नालीचे काम निकृष्ट दर्जाचे करून शासनाच्या निधीची लूट करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून काळया यादीत टाकण्याची मागणी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वतघट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव अंतर्गत येणाऱ्या खैरी (चौरस्ता) ते खैरी गावात जाणाऱ्या रस्ता व नालीचे सिमेंट काँक्रिटचे काम सुरु आहे परंतु शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवुन तसेच अंदाजपत्रकातील मापदंडाला बगल देवुन निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून या रस्त्याचे व नालीचे काम केल्या जात असल्याने ही नाली सुद्धा ढासळली असल्याने यावरून या कामाचा दर्जा लक्षात येतो .निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाची फसवणूक संबंधित कंत्राटदार करीत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे काम चांगले कसे होईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे तसेच निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाच्या निधीची लुट करणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकण्याची कारवाई करण्यात यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जनआंदोलन छेडण्याचा ईशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरघट यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी मनसे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार, सादिक शेख, रोशन गुरुनुले, आणी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

चौकट

नागरिकांना रहदारीस चांगले रस्ते असले पाहिजे हा हेतु समोर ठेवून शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने रस्ते,नाल्यांचे काम करण्यात येते परंतु शासनाचा आलेला विकास निधी बांधकाम विभागातील अधिकारी,कर्मचारी व कंत्राटदार आपल्या घशात कसा उतरविला जावून आपला पोटप्रपंच कसा भागेल यावर लक्ष केंद्रित करून निकृष्ट दर्जाचे काम जनतेच्या माथी मारीत आहेत यावर बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवुन या कामांची चौकशी करून निकृष्ट काम होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकारी,कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी तसेच निकृष्ट काम करून शासनासोबतच्या करारनाम्याचा भंग करणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाकावे अन्यथा बांधकाम विभागाच्या विरोधात मनसेच्या वतीने जनआंदोलन करण्यात येईल.


शंकर वरघट
(जिल्हा उपाध्यक्ष मनसे)