
प्रतिनिधी::प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी शहरात
सुद्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी जेष्ठा गौरी उत्सव मोठ्या आनंदात घरोघरी साजरा करण्यात आला तसेच यावेळी गावात ठिक ठिकाणी महाप्रसादासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तसेच गौराई महालक्ष्मी मातेचे मोठ्या उत्साहात पूजन करण्यात आले. दीड दिवसाची महालक्ष्मी माता म्हणजे गौराई माता हिचे आगमन झाले .आकर्षक देखावे घरोघरी तयार करण्यात आले होते .यावेळी गावात दुकाणे सजलली होती.शहरात खरीदीकरीता सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी बघायला मिळाली होती. जिकडे पहावे तिकडे महालक्ष्मी गौराईच्या पूजनाच्या तयारीचे चित्र दिसत होते .दीड दिवसाची गौराई ही मात्र वर्षाचे सुख देऊन जाते. अनेकांचे मनोकामना पूर्ण करते. महालक्ष्मीचे सर्वांकडे पूजन व आरती झाली .त्याचप्रमाणे महाप्रसाद सुद्धा झाला. या महाप्रसादाला खूपच महत्त्व दिले जाते. अनेक नागरिक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी उत्सुक राहतात व आरती व प्रसादासाठी मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. आकर्षक देखावे ,लाइटिंग ,मनमोहक हार फुलांनी महालक्ष्मीचे सजावट केल्या गेली होती .अनारसे, करंजी , पुरणपोळी, लाडू अनेक असे पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवली होती .प्रसादामध्ये आंबिलीचे खूपच महत्त्व असते .इष्ट मित्रांना निमंत्रण देऊन प्रसाद ग्रहण करण्यासाठी बोलावल्या जाते. अनेक भक्तगण दर्शनासाठी जातात व आपल्या मनोकामना महालक्ष्मी माते समोर मांडतात यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात महालक्ष्मीचे आगमन तालुक्यात नागरिकांकडे झाले होते व मोठ्या उत्साहात गौराई महालक्ष्मी मातेचे पूजन करण्यात आले.
आपल्या पारंपरिक गोष्टी ज्या लुप्त होत चालल्या, कुठे तरी त्याची आठवणी म्हणून हा गौरी गणपतीचा एक आगळा वेगळा असा देखावा ढाणकी येथील विजय चोधरी यांनी केला असून हा देखवा बघण्यासाठी अनेकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती
