
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढत असल्याने त्याचा फटका आता शेतकऱ्यांना लागणाऱ्या प्रत्येक वस्तूवर बसत आहे. जसे की रासायनिक खते बी बियाणे. प्रामुख्याने विदर्भात रब्बी हंगामात हरभरा व गहू या दोन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. तर तेवढ्याच प्रमाणात शेतकऱ्यांना बी बियाणे सुद्धा लागतं पण कंपनीच्या बियाण्याच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहे त्या शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाही त्यामुळे यावर्षी काही शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे कट सीड्स म्हणून वापर केला आहे असाच प्रयोग मारेगाव तालुक्यातील कोसारा या गावच्या चंद्रशेखर टापरे या शेतकऱ्यांनी करून आजच्या घडीला परिसरातील शेतकऱ्यांसाठी आदर्श निर्माण केला असून त्यांचे हरभरा पिक परिसरात चांगल्या पद्धतीत उभे आहे.
मौजा कोसारा येथील प्रगतसील शेतकरी चंद्रशेखर भास्कर टापरे यांनी आधुनिक पद्धत्तीने हरभरा पिकाची दोन तासांमधील अंतर 3 फूटाचे ठेवून लागवड केली हा या परिसरासाठी एक प्रयोग आहे. लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची योग्य प्रकारे मशागत करून बियानास रासायनिक व जैवीक बीज पक्रिया केली. रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर केला एकात्मिक कीड रोग व्यवंस्थापणासाठी जैविक व रासायनिक पद्धतीचा योग्य वापर केला. तसेच पाणी व्यवस्थापना साठी ठिबक सिंचनाचा वापर केला तसेच मर रोग व्यवस्थापणासाठी ट्रॅकोड्रमा चा वापर केला तसेच कीड व्यवस्थापना साठी कामगन्ध सापळे यांचा वापर वापर करून हरभरा या पिकाचे उत्कृष्ट व्यवस्थापन केले आहे. आज रोजी परिसरात त्यांच्या शेतातील हरभरा हे पीक डौलदार रुबाबात उभे आहे.
आज रोजी पिकाची परिस्थिती पाहता त्यांना एकरी १५ ते२०क्विंटल उत्पादन मिळेल अशी त्यांना व त्यांचे हरभरा पिक पाहायला येणाऱ्यां शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे.तसेच यापूर्वी त्यांनी खरीप हंगामात सरीवरंभा पद्धत्तीत सोयाबीन टोकन पद्धतीत घरचे बियाणे लावून एकरी 13 क्विंटल उत्पादन घेतले होते. चंद्रशेखर टापरे हे शेतकरी नेहमी शेती पिकाच्या बाबतीत प्रयोगशील असतात.