
सहसंपादक : रामभाऊ भोयर
पांढरंकवडा तालुक्यातील मोहदा (झोटींगधरा )या शिवारातील शेतकरी सुभाष तुकाराम खारकर वय 60यांचे शेत गट नं 168 झोटींगधरा या शिवारात शेतातील गोठ्याला दि 9 एप्रिल २०२५ बुधवारी संध्याकाळी 7.00वाजता दरम्यान अवकाळी हवा, पावसामुळे यांच्या शेतात वीज कोसल्यामुळे गोठ्याला आग लागली असुन यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात स्पिंक्रलर पाईप 30 नग , स्पिंक्रलर नोझल 8 नग, स्प्रे पंप ०२ नग, , लाकुड फाटा १० नग,रासायनिक खत 10ब्याग टिन पत्रे 20या वस्तू व शेतीचे जळुन खाक झाले आहे. तर बैलजोडी मधील दोन्ही बैलाची डोळे गेलेला अवसस्थेत आहे व शरीर पूर्ण पणे जळलेले आहे याची माहिती मिळताच तलाठी एस. ए.कन्नाके मोक्का पाहणी केली व सम्पूर्ण माहिती दिली
तहसीलदार साहेब यांनी फोन करून शेतकऱ्यांना बोलण करून धीर दिला. व बाबतीतचा अहवाल तलाठी यांनी तहसीलदार राजेंद्र इंगळे यांना दिली असून अधिक तपास करीत आहे.