
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर
गरीब घरात जन्माला येऊन ग्रामीण अडीअडचणीत वाढलेल्या मुलांना शहरात जाण्याची संधी मिळाली आणि तेथील नवलाई पाहून निरागस मुले आनंदी झाली ही संधी वाढोणा बाजार जिल्हा परिषद शाळेने आयोजित केलेल्या सहलीमुळे मिळाली कोरोनाच्या काळात शैक्षणिक उपक्रमांना खीर बसली होती त्यातून विद्यार्थ्यांना परत उत्साह मिळून देण्यासाठी शाळेच्या वतीने नागपूर दर्शन ही शैक्षणिक सहल शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली व या शैक्षणिक सहलीचे प्रमुख यांच्या आयोजनाखाली शैक्षणिक सहलीचे आयोजन केले सर्वप्रथम मेट्रो ने सफर करून विद्यार्थ्यांनी संपूर्ण नागपूर शहराचा आनंद लुटला त्यानंतर विज्ञानाचा खजिना असलेल्या रमण विज्ञान केंद्राला भेट देऊन तारांगण थ्री डी शो व विज्ञान प्रयोग यांचा प्रत्यक्ष योग विद्यार्थ्यांना जुळवून आणला त्यानंतर नागपुरी येथील प्राणी संग्रहालय समजल्या जाणाऱ्या महाराज बागला भेट देऊन तेथील प्राण्यांची माहिती विद्यार्थ्यांना झाली त्यानंतर दीक्षाभूमी येथे भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची व जीवनाची माहिती विद्यार्थ्यांना झाली विद्यार्थी हे ग्रामीण भागातील असल्यामुळे आज पर्यंत विमानाकडे बघायचे परंतु या सहलीमुळे नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष विमानाचे उडान बघितले ही शैक्षणिक सहल यशस्वी करण्याकरिता सहल प्रमुख मनोज कुमार शेडमाके मुख्य अध्यापक गुणवंत इंगोले पदवीधर शिक्षक दीपक करपते सहाय्यक शिक्षिका सुनीता आत्राम व केंद्रप्रमुख प्रवीण कोल्हे यांनी प्रयत्न केले.
