
शासनाच्या सेवायोजन कार्यालयामार्फत शासनाच्या विविध शासकीय कार्यालयात सुशिक्षित बेरोजगारांनी तीन वर्षे सेवा केली. त्या कालावधीत त्यांना 300 रुपये मानधन मिळत होते व त्यानंतर तीन वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांना सेवेतून काढून टाकण्यात आले .त्यानंतर या सुशिक्षित बेरोजगारांनी संघटन तयार करून शासनाची सतत लढा देऊन त्या सुशिक्षित बेरोजगारांच्या लढ्याला यश येऊन पदवीधर अंशकालीन कर्मचारी या नात्याने शासनाच्या सेवायोजन कार्यालयात नोंद झाली . परंतु बऱ्याच पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा संपुष्टात आल्यामुळे त्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागले .अशा पदवीधर अंशकालीन अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना १० टक्के समांतर आरक्षण देऊन शासकीय सामावून घेण्यात यावे याकरिता वेळोवेळी आंदोलन केल्यामुळे त्यांना वेळोवेळी वय वाढवून देण्यात आले .परंतु प्रत्यक्षात या कर्मचाऱ्यांना घेण्याबाबत अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या पदवीधर बेरोजगार अंशकालीन कर्मचाऱ्यांचे दिवसेंदिवस वाढत गेले आणि सरकारने वेळोवेळी यांना वयोमर्यादा शितलता देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम शासनाने केले .परंतु आज पर्यंत सेवाजेष्ठता आदीनुसार पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना नोकरी करता आजपर्यंत विचार करण्यात आलेला नाही .सरकारने या बेरोजगार अंशकालीन कर्मचाऱ्यांचशी वेळ काढू धोरण अवलंबून 27 वर्षे या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळ केला आणि या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा फक्त राजकीय स्वार्थासाठी वापर केला. बऱ्याच पदवीधर बेरोजगार अंशकालीन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे .बरेच पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी लग्न केलेले नाही. बरेच पदवीधर अंशकालीन कर्मचारी मरण पावले. 90% पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा ओलांडली आहे त्यामुळे १० टक्के आरक्षणाचा लाभ ज्या पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना झालेला नाही अशा पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना या १० टक्के समांतर आरक्षणाचा नोकरीत लाभ देण्यात यावा . व सेवानिष्ठतेनुसार वेगळी यादी तयार करण्यात सरळ सेवा भरती द्वारे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक गुणवत्तेनुसार यादी तयार करून त्यांना नोकरीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी सुद्धा पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांनी केलेली आहे .
शासनाने 27 वर्षे पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी खेळ खेळणाऱ्या राजकीय स्वार्थी नेत्यांना पदवीधर अंशकालीन कर्मचारी कधी माफ करणार नाही
संजीव भांबोरे पदवीधर अंशकालीन कर्मचारी भंडारा
१० टक्के आरक्षणाचा लाभ
आमची वयोमर्या संपल्यामुळे आमच्या पाल्यांना समांतर आरक्षणाचा सरळ सेवा भरतीत लाभ देण्यात येऊन त्याची सेवाजेष्ठता यादी तयार करण्यात यावी नोकरीत लाभ देण्यात यावा
नेकरम हरडे पदवीधर पदवीधर अंशकालीन कर्मचारी भंडारा
कोर्टाच्या आदेशानुसार व शासन निर्णयानुसार १० टक्के आरक्षणासहित आमची वयोमर्यादा संपल्यामुळे आमच्या पाल्यांना सरळ सेवा भरतीत प्राधान्य देण्यात यावे .
शैलेंद्र जांभुळकर पदवीधर अंशकालीन कर्मचारी भंडारा
