खडकी ते येवती मार्ग जाणाऱ्या राळेगाव रोडची दयनीय अवस्था

राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर


राळेगाव तालुक्यातील खडकी ते येवती मार्गे राळेगाव जाणाऱ्या रोडची गिट्टी ओव्हरलोड वाहतूक मुळे उखडली असल्याचे दिसून येत आहे. सविस्तर वृत्त असे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येत असलेल्या खडकी ते येवती मार्गे जाणाऱ्या राळेगाव रोडने जागोजागी खड्डे पडून गिट्टी उखडून असल्याचे दिसून येत आहे तर परसोडा गावाजवळ एका नाल्यावरील पुलाचे काम झाले आहे. या पुलाच्या कामावर साईट पट्ट्याने मुरूम टाकण्याऐवजी सर्रास मातीचा वापर केला असल्याचे दिसून येत आहे. सदर दोन वर्षांपूर्वी या रोडचे डांबरीकरण करण्यात आले होते परंतु या रोडचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची ओरड या परिसरातील जनतेकडून होताना दिसत आहे. सदर या मार्गाने मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहतूक होत आहे सदर खडकी, चहांद, परसोडा, येवती, धानोरा मार्गे राळेगाव जाणाऱ्या रोडने जागोजागी गिट्टी उखडून खड्डे पडून असल्याचे दिसून येत आहे तर वर्धा जिल्ह्यातून पोहणा मार्गे येवती येणाऱ्या पोहणा नदीवर कोटी रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम केले आहे परंतु कित्येक दिवसापासून त्याही पुलावर मोठ-मोठे खड्डे पडले आहे कित्येक लोकांचा किरकोळ अपघात सुद्धा झाला असल्याचे सांगितले जात आहे परंतु याकडे कोणीही लक्ष देताना दिसून येत नाही. सदर वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट तालुका अंतर्गत येत असलेल्या पोहना येथे महाशिवरात्रीच्या दिवशी पासून तर चार ते पाच दिवस मोठ्या प्रमाणात जत्रा भरत असते या जत्रेला यवतमाळ जिल्ह्या सह वर्धा जिल्ह्यातील लाखो भाविक भक्त शंकराच्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात त्यामुळे पोहना ते येवती वर्धा नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे प्रमाण वाढणार आहे. वर्धा नदीच्या पुलावरून दोन्ही बाजूला दीड ते दोन फुटाचे खड्डे पडले आहे अशा परिस्थितीमध्ये एखादा मोठा अपघात घडल्यास याला जबाबदार कोण? तर 20 ते 25 दिवसा पूर्वी खडकी ते येवती मार्ग राळेगाव जाणाऱ्या रोडची रिपेरिंग करण्यात आली होती परंतु अजूनही रोडची परिस्थिती जैसी तीच दिसून येत असल्याने या परिसरातील वाहन चालक व गावकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे सदर या दोन्ही रोडच्या कामाकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन संबंधित ठेकेदार यांच्याकडून काम करून घेण्याची मागणी जनतेकडून होताना दिसत आहे
प्रतिक्रिया
मोठ्या प्रमाणात बोर लोड वाहतूक होत असल्याकारणाने वीस ते पंचवीस दिवसात रिपेरिंग केलेल्या कामाची गिट्टी बाहेर तर परसोडा गावाजवळ नाल्यावरील झालेल्या मुलाच्या कामांमध्ये साईट पट्ट्याने मुरूम टाकण्याऐवजी सर्रास मातीचा वापर केला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे
(१) अभिमान वाल्मीक कटिंग
(२) रुपराव दामोदर उराडे
धानोरा