
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने आज दिनांक 8/9/2025 रोज सोमवारला सकाळी ठिक 1.00 वाजता राळेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन महाराष्ट्रातील भाजपाप्रणीत महायुती सरकारने मराठ्यांना ओबीसी मध्ये घेण्याचा जी आर काढून ओबीसी मधील अठरापगड,बारा बलुतेदार अशा 350ओबीसी जातीच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याने त्याकरिता महाराष्ट्र सरकारचा जी आर चा निषेध नोंदवून राळेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.त्यावेळी ओबीसी सेल यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अरविंद वाढोणकर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राळेगाव तालुका अध्यक्ष राजेंद्र तेलंगे, शहराध्यक्ष प्रदीप ठुणे, ओबीसी सेलचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र नागतुरे राळेगाव शहराध्यक्ष ओबीसी सेल राहुल होले, किशोर धामंदे श्रावणसिंग वडते, अंकुश रोहणकर, मारोती पाल, अफसर अली सैय्यद प्रविण नरडवार शेखर तेलंगे योगेश कुरटकर देविदास चिमंत्रवार देवकिरण बांडबुधे श्रीराम लोखंडे विवेक लखेसार मंथन ठुणे नानाजी भोकरे पुरूषोत्तम चिडे सुनील भामकर वसंत डाखोरे राजू महाजन श्रीधर थुटुरकर गजानन पाल प्रविण महाजन,भरत ठुणे अशोक पिंपरे जितेंद्र कहूरके मधूकर राजूरकर गजानन महाजन शंकर पोहणकर अनिल केवटे गजानन झाडे अँड किशोर मांडवकर अंकित कटारिया मिलिंद इंगोले मंगेश पिंपरे पदमाकर राऊत पंकज गावंडे रविंद्र शेराम, विनोद नरड, गजानन नाकाडे, श्रीकांत कोदाणे, विनोद माहुरे,अंकुश मुनेश्वर किसना झाडे यांच्या सह अनेक ओबीसी समाजाचे लोक उपस्थित होते.
