
०३ एप्रिलला तातापुरात रंगणार हागोडबुआ देवस्थानाची भव्य यात्रा
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
केळापूर तालुका येथील तातापुर येथे दरवर्षी प्रमाणे चैत्र पौर्णिमेच्या यात्रेचे मोठ्या उत्साहात भोई समाज बांधवाच्या वतीने आयोजन करण्यात येते तरी सर्व भोई समाज बांधवांनी ०३/०४/२०२६ रोजी शुक्रवार ला येऊन यात्रेची शोभा वाढवावी अशी हागोडबुआ देवस्थान च्या समितीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे हामोडबुआ देवस्थान हे भोई समाजाचे श्रद्धास्थान आहे काही वर्षांपूर्वी तातापुर गावामध्ये सदबाजी इंगोले नावाचा एक व्यक्ती राहात होता त्यांच्या पत्नीचे नाव सोनाबाई सदबाजी इंगोले असे होते सदबाजी धार्मिक होता त्यांना ४ वर्षाचा मुलगा होता ते रोज आपल्या मुला सोबत तातापुर संगमेश्वर नदीवर आंघोळीसाठी जात होते एक दिवस सदबा नदीमध्ये आंघोळ करत असतांना हा त्यांच्या मुलाचा आरडाओरडा करण्याचा आवाज ऐकुन तो घाबरून गेला आजुबाजूला मुलाला पाहू लागला तरी सुद्धा मुलगा मिळाला नाही तेव्हा त्याला माहीत झाल का आपल्या मुलाला काही तरी झाल आहे असे पाहुन सदबाजी ला मोठा धक्का बसला व सदबा ला मुलाला पाहता पाहता रात्र झाली घरी सदबा च्या बायको ला चिंता वाटत होती का माझा नवरा मुलगा रात्र झाली पण अजून पर्यंत घरी आले नाही खुप रात्र झाल्यामुळे सोनाबाई कुठेही जाऊ शकली नाही रात्री सोनाबाई ला स्वप्न पडले आई मि नदीवर आंघोळ करत असतांना माझ्यावर वाघाने हल्ला केला आणि माझा मृत्यू झाला वाघाने माझ्या वर हल्ला केल्यामुळे माझ्या शरीराचे कोणतेही अवयव राहीले नाही परंतु माझ्या शरीराच एकच अवयव ऊरले आहे ते म्हणजे उजव्या हाताची करंगळी आहे ती करंगळी घेऊन त्याच जागेवर स्थापन करा तसेच तेच स्वप्न आजुबाजूच्या गावातील लोकांना सुद्धा पडले असतांना लोकांनी त्या जागेवर जाऊन चौकशी केली व खरोखरच त्याच ठिकाणी त्या मुलाची करंगळी पडलेली होती सर्व भोई सामाजातील बांधवांनी त्या ठिकाणी त्याची हामोडबुआ नांव देऊन स्थापना केली तेव्हा पासून चैत्र पौर्णिमेच्या दिवशी त्याच्या लग्नानिमित्त एक दिवसाची यात्रा भरवण्याचे भोई समाज बांधवांनी ठरवले अनेक वर्षांपासून आजही त्या ठिकाणी चैत्र पौर्णिमिच्या दिवशी मोठ्याप्रमाणात यात्रा भरत असते असे होगोळबुआ देवस्थान चे अध्यक्ष कैलास नांन्ने, उपाध्यक्ष लिबाजी शिवरकर,कोषाध्यक्ष अमोल कार्लेकर,सदस्य लक्ष्मण करलूके,सदस्य बापू पारशिवे, सदस्य लक्ष्मण शिवरकर,सदस्य रमेश शिवरकर,सदस्य शेखर नांन्ने,सदस्य प्रकाश पारशिवे, सदस्य गोपाल नांन्ने,सदस्य बंडुजी नांन्ने,सदस्य रमेश शिवरकर,सदस्य अर्जुन करलूके,सदस्य संजय नांंन्ने,सदस्य काशिनाथ पारशीवे,सदस्य चंद्रकांत कामतवार,सदस्य सुरेश करलुके,सदस्य संतोष मांढरे, सदस्य गजानन शिवरकर आदींनी सर्व भोई समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात येत आहे
