
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षणाच्या जोरावर उल्लेखनीय संपादन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांमध्ये श्री अमर रंगांना कोंडा पलकोलवार सर यांचे नाव चमकत आहे केळापूर तालुक्यातील महांडोली या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या अमर सरांनी आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर शिक्षक ते संशोधक असा प्रेरणादायी प्रवास घडून आणला आहे. लहानपणापासूनच त्यांच्यावर तेलगू संस्कृतीचा प्रभाव असून साधेपणा कष्टाची तयारी आणि मूल्याधिष्ठित जीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ठरली. प्राथमिक शिक्षण गावात पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी तालुक्याचे ठिकाणी प्रयाण केले आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी शिक्षणाची वाट कधीही सोडली नाही पदवी B.A.पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागपूर विद्यापीठ येथे इतिहास व राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीत पूर्ण करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःची भक्कम पायाभरणी केली.
सध्या ते सावरखेड तालुका राळेगाव जिल्हा यवतमाळ येथील अनुदानित आश्रम शाळेत उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. नोकरी सांभाळत असतानाच त्यांनी २०१७ मध्ये SET परीक्षा उत्तीर्ण होऊन आपली शैक्षणिक पात्रता अधिक भक्कम केली. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडत स्वतःच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देणे हा त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा पैलू ठरला. आई-वडील भाऊ-बहीण मुले आणि विशेषता त्यांच्या अर्धांगिनीची त्यांना सतत सहकार्य लाभले. भावाच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली. समाजकार्याची प्रेरणा त्यांना विनोबा भावे यांच्या कार्यातून मिळाली, भूदान चळवी चळवळीच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी “भूदान चळवळ :एक अध्ययन “या विषयावर स्वर्गीय दत्तात्रय पुसदकर कला महाविद्यालय नांदगाव पेठ तालुका जिल्हा अमरावती येथील आदरणीय प्रा. डॉ.गोविंद तिरमनवार सर यांच्या मार्गदर्शनात सखोल संशोधन केली असून त्यांच्या संशोधनातून समता न्याय आणि सहकार्य या मूल्यांना अधोरेखित करण्यात आले. दिनांक ४/२/२०२६ रोजी संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती तर्फे त्यांना आचार्य ही पदवी बहाल करण्यात आली. शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानासोबतच संस्कार आणि आत्मविश्वास रुजवण्याचे कार्य करतात ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची प्रेरणा देणे त्यांना योग्य दिशा दाखवणे आणि त्यांच्यातील क्षमता ओळखून ते विकसित करणे हे त्यांचे ध्येय आहे.
श्री अमरकोंडा पल्कुलवार सर यांचा जीवन प्रवास हा केवळ वैयक्तिक यशाचा नाही तर समाजासाठी प्रेरणादायी आदर्श आहे कठीण परिस्थिती ही शिक्षणाची कास धरून सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते हा संदेश त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येतो.
