
संपूर्ण देशभरात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या व्याघ्र प्रकल्पात मागील 4 दिवसात 6 वाघांचा मृत्यू झाल्याने व्याघ्र संवर्धन ऐरणीवर आले आहे.
दोन दिवसांपूर्वी ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात एक बछडा मृतावस्थेत आढळून आला होता. आता याच परिसरात आणखी चार बछडे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शिवणी बफर क्षेत्रातील ही घटना आहे. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प हा वाघांसाठी ओळखला जातो. 1 डिसेंबर रोजी शिवणी बफर क्षेत्रात वाघाचा एक बछडा मृतावस्थेत आढळून आला होता, याच परिसरात आता आणखी चार बछडे मृतावस्थेत आढळून आले आहेत.
मृतावस्थेतप्राथमिक अंदाज : वाघ जो प्रजननाच्या काळात येतो तेव्हा तो अत्यंत हिंसक आणि आक्रमक होतो. अशावेळी वाघिणीच्या समागमासाठी तो बछड्यांना मारतो. अशाच घटनेत या बछड्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला होता.
वाघ आढळून आला :1 डिसेंबरला कर्मचारी गस्तीवर असताना ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या शिवनी बफर क्षेत्रातील कंपार्टमेंट क्रमांक 265 मध्ये तीन ते चार महिन्याचे बछडे आढळून आले होते. 30 नोव्हेंबरला T 75 ही वाघीण कुजलेल्या अवस्थेत मृत आढळून आल्याने या बचड्यांवर वनविभाग नजर ठेवून होता. 2 डिसेंबरला याच परिसरात एक वाघ आढळून आला होता.
अधिक तपासासाठी ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
3 डिसेंबरला हे सर्व चार बछडे मृतावस्थेत आढळून आले. यापैकी दोन नर तर दोन मादी आहेत. या चारही बचड्यांच्या शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. वाघाच्या हल्ल्यात या बचड्यांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच परिसरात एक वाघीण देखील असल्याने हे बछडे नेमके कोणाचे याचा शोध सुरू आहे. आईची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व बचड्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आले असून त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. तसेच कॅमेरा ट्रॅप्स लावून आणि क्षेत्रीय कर्मचारी तैनात करून परागंदा वाघांच्या हालचालीसाठी टिपण्यात येणार आहे.
