सीसीआय च्या कापूस खरेदीला प्रारंभ

सहसंपादक: रामभाऊ भोयर

राळेगाव येथे भारतीय कपास निगम लिमिटेड अर्थात सीसीआयद्वारा काल दिं १४ डिसेंबर २०२३ रोज गुरुवार पासून कापूस खरेदीचा शुभारंभ देशमुख जिनिंग कळंब रोड राळेगांव येथे करण्यात आला आहे. यावेळी शुभारंभ प्रसंगी उपस्थित बाजार समितीचे सभापती अँड.प्रफुल मानकर, संचालक गोवर्धन वाघमारे, संचालक अंकित कटारिया, तसेच सी सी आय चे केंद्र प्रभारी अमित कोहळे, वाढोना बाजारचे केंद्रप्रभारी प्रमोद पाटील, बाजार समितीचे सचिव सुजित चल्लावार ,केंद्र प्रमुख विनोद झामरे आधी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी कापूस विक्रीकरिता आणत असताना शेतकऱ्यांनी
(१) आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असलेले (२) सन २०२३-२४ चा ऑनलाईन पीक पेरा नोंदणी केलेला सातबारा आठ अ (३) मोबाईल नंबर आधार कार्डाची लिंक असलेला मोबाईल सोबत असणे अनिवार्य आहे तसेच शेतकऱ्यांनी आपला कापूस खरेदी केंद्रावर ८ ते १२ टक्के आद्रतेखालील कापूस विक्रीसाठी आणावा १२ टक्के आद्रतेच्यावरील कापूस विक्रीसाठी आणू नये याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी
केंद्रप्रभारी
अमित कोहळे