
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
मुंबई ऐन दिवाळीमध्ये सुरु झालेला एसटी कर्मचार्यांचा संप सुटेल अशी आशा निर्माण झाली आहे. राज्य सरकारकडून सटी कर्मचार्यांना पगारवाढ या महिन्यापासून जाहीर केली आहे. राज्य सरकारने अंतरिम वेतनवाढीच्या प्रस्तावाला एस. टी. कर्मचारी शिष्टमंडळाने मंजुरी दिली आहे. यामुळे मागील तीन आठवड्यांहून अधिक काळ एसटी बंद आहे.परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत झालेल्या निर्णयाची माहिती दिली. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती.
