राळेगाव तालुक्यात पावसाचा हाहाकार : शेतातील पिके पाण्याखाली (खैरी वरोरा राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प)

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यात दिनांक 26 जुलै पासून सुरू झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार घातला असून खैरी, कोच्ची, वरध,वाढोणा,येवती, धानोरा,चहांद,मेघापुर,वारा,चिखणा व राळेगाव तालुक्यातील इतरही गावात ढगफुटीचे दृश्य दिसत आहे येथील अनेक शेतातील पिके पूर्णतः पाण्याखाली आली . तसेच वर्धा नदीवर असलेल्या पुलावरून पाणी असल्यामुळे खैरी – वरोरा या राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे .
दिनांक 26 जुलै सायंकाळ पासून राळेगाव तालुक्यात सतत धार पाऊस सुरू असून नदी नाल्यांना पूर येऊन शेतामध्ये पुराचे पाणी शिरले असून शेत पिके पाण्याखाली आली असून शेतकऱ्यांचे यामुळे मोठे नुकसान झाले आहे. आधीच मेटकीटीस आलेला शेतकरी या पावसामुळे शेतमालाच्या झालेल्या नुकसानीमुळे हतबल झाला आहे. आता शेतकऱ्यावर त्या ओढवलेल्या संकटावर शासनाकडून काय मिळते व शासन काय मदत करतील या आशेवर शेतकरी विसंबून आहे. तसेच या पावसामुळे खैरी ते वरोरा हा राज्य मार्ग वरील वाहतूक पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे ठप्प झाली असून पूला शेजारी बॅरिकेट लावून मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस पथक व वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय महल्ले हे सुद्धा खैरी परिसरात व इतर परिसरात पेट्रोलिंग करत होते.