
प्रतिनिधी:तेजस सोनार ,नाशिक
नाशिक : येथील आम आदमी पार्टीच्या जुने नाशिक परिसरातील संपर्क कार्यालयाचे उद्घाटन व जनसामान्यांचा पार्टी प्रवेश सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. प्रदेश प्रवक्ता जितेंद्र भावे यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी परिसरातील अनेक सर्वसामान्य नागरिकांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला. यावेळी उपनेता जयंत मुळे, संघटक विनायक येवले, सचिव जगबीरसिंग, नोंदणी अध्यक्ष राजेंद्र गायधनी, सोशल मीडिया प्रमुख नितीन शुक्ल, सोमनाथ कु-हाडे, एकनाथ सावळे, संजय कातकाडे, प्रतिक पवार, माजीद पठाण, कस्तुरी आठवणे, स्नेहल मुळे, आशी लुथरा, अॅड राजेंद्र हिंगमिरे, सचिन अहिरे, घनश्याम अहिरे,, वाल्मीक सानप, रविंद्र पाटील, निलेश दूसे, शशिकांत तिडके, अनंत चांदवडकर, सुरेश वाघ, सुयश मुळे, वैभव वाघ, रफिकभाई आदी पदाधिकाऱी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येत्या मनपा निवडणुकीत आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार असून, अॉपरेशन हॉस्पिटल, अॉपरेशन स्कूल, अॉपरेशन ब्लॅक स्पॉट्सच्या यशानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये आम पार्टीकडे मोठ्या अपेक्षेने लोक बघत आहेत व येत्या महापालिका निवडणुकीत त्याचा चांगला परिणाम दिसेल असे प्रतिपादन याप्रसंगी जितेंद्र भावे यांनी केले. यावेळी अनेक नागरिकांना पक्षात प्रवेश देण्यात आला.
