
सहसंपादक : रामभाऊ भोयर
गुजरी येथील सचिन भावराव वऱ्हाडे वय ३७ वर्ष हा राळेगाव वरून वडकी कडे जात असताना दिं ३० ऑगस्ट २०२३ च्या सायंकाळी ९:०० वाजताच्या दरम्यान आपटी फाट्याजवळ भरधाव वेगाने मागून येणाऱ्या अज्ञात वाहनांने धडक दिल्याने सचिन च्या डोक्याला व पायाला हाताला जब्बर मार लागून जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
सचिन हा वऱ्हाडे हा गुजरी वरून वडकीकडे काही कामा निमित्य स्वतःच्या बजाज डिस्कव्हर एम एच २९ ए क्यू ६३५३ या क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना सायंकाळी ९ :०० दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव अज्ञात वाहनाने जब्बर धडक दिल्याने सचिन चा जागीच मृत्यू झाला याबाबत फिर्यादी भुपेश भावराव वऱ्हाडे वय ४८ वर्ष यांच्या जबानी रिपार्ट वरून सदर अज्ञात वाहन चालका विरुद्ध २७९,३०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ सुभाष काळे करीत आहे.
