
सहसंपादक : रामभाऊ भोयर
आदिवासी गणेशत्सव मंडळ करंजी ( सो ) येथे वडकी पोलीस स्टेशन येथील नव्याने रुजू झालेले ठाणेदार सुखदेवजी भोरखेडे साहेब यांच्या हस्ते श्री.गणेशाची आरती पूजन करून मंडळाच्या व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा स्वागत- सत्कार करण्यात आला,त्याच बरोबर करंजी ( सो ) येथील महाराष्ट्र पोलीस सेवेत चालक या पदावर रुजू झालेले अमीर किन्नाके यांचा ठाणेदार साहेबांच्या व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी ठाणेदार भोरखेडे साहेब यांनी उपस्थित गावकरी भाविकांना शांतता व सुव्यवस्था या विषया वर मोलाचे मार्गदर्शन केले.
या वेळी कार्यक्रमाचे आयोजक करंजी ( सो ) येथील सरपंच.श्री प्रसाद ठाकरे,सचिन देठे,अध्यक्ष प्रफुल आत्राम,आदित्य कडू,देवानंद मेश्राम,रितेश दांडेकर व गणेश मंडळाचे समस्त सदस्य तथा गावकरी उपस्थित होते..
