
हदगांव – अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारे जून आणि जुलै चे धान्य वाटप करण्यात यावे यासाठी मा.तहसीलदार हदगाव यांना वंचित बहुजन महिला आघाडी चे निवेदन देण्यात आले. अन्न सुरक्षा योजने मधून दिले जाणारे मोफतचे धान्य जून जुलै महिन्याचे लाभार्थ्यांना मिळालं नाही,त्यामुळे लोकांमध्ये कमालीची उद्रेक बघायला मिळत आहे.सामान्य लोकांच्या भावना लक्षात घेवून,गरीब,गरजू, शोषित,पीडित ,शेतकरी,मजूर, वंचीत घटकांना अन्न मिळाले पाहिजे या साठी आज वंचित बहुजन महिला आघाडी च्या वतीने मा.तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले…निवेदनाची दखल न घेतल्यास आपल्या कार्यालय समोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे यावेळी उपस्थित वंचित बहुजन आघाडी हदगाव तालुका अध्यक्ष देवानंद पाईकराव,महिला आघाडी हदगाव तालुका अध्यक्ष सुनीता सुरेश वाठोरे ,डॉ.डी.के.नाईक ,हेमंत नरवाडे सरपंच.इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते
