स्त्री शक्ती फाउंडेशन तर्फे वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे हा कार्यक्रमाचे आयोजन

स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका किरण संजय देरकर यांनी उपेक्षित महिलांना आधार देत मागील वर्षी कर्तबगार महिलांना एक कार्यक्रम घेत व्यवसायाचे पीठ उपलब्ध करून दिले होते. तेव्हापासून ग्रामीण भागातील शेतकरी, स्त्रिया,कामगार महिला,व व्याधीने अडचणीत असलेल्या भगिनींना आधार देत,स्त्री शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आधार दिलाय आहे.

सन्मान स्त्री शक्तीचा या फाऊंडेशन द्वारे वाण आरोग्याचं व महिलांच्या सन्मानाचे हा कार्यक्रम परमडोह येथे आयोजीत करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरवातीला स्री -शक्तीचे दमदार स्वागत व जल्लोष करण्यात आला.राष्ट्रसंत तुुकडोजी महाराज व संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक अधक्ष किरण देरकर या प्रमुख उपस्थित होत्या सोबतच प्रमुख पाहुणे म्हणुन.गीता काकडे,पोलीस पाटील-.कलावती डवरे,.लता वाभीटकर, कु.श्वेता जैन (ईंडेन गॅस संचालीका).सुरेखा ढेंगळे(व्यसनमुक्ती संघटना अध्यक्ष).शारदा चिंतकुंटलवार (सा.कार्यकर्त्या)होत्या.त्या वेळी परमडोह गावातील शेकडो पेक्षा जास्त महिला उपस्थित होत्या. किरण देरकर यांनी उपस्थीत महिलांना विधवा प्रथा,रुढी-परंपरा समाजाला कशा घातक आहे त्या बद्दल मार्गदर्शन केले . परिसरातील महीला वर्ग यांना सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशनची चळवळ प्रत्येक स्त्री पर्यंत कशी पोहचेल आणि त्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करुन महिलांना न्याय- हक्क मिळवून देण्यासाठी त्यांना जागृत करण्यासाठी परमडोह गावात” सन्मान स्त्री शक्ती फाऊंडेशन” ची स्थापना केली ही संघटना नेहमी तत्पर असेल असे आश्वासनच नाहीतर विश्वास निर्माण केला.त्यावेळी आशासेवीका योगीता डाखरे,फुलझेले मॅडम PSC , भावना कीनाके यांचा सत्कार केला.नागेश मोहूर्ले यांनी सूत्रसंचालन केले व राजेंद्र ईद्दे यांनी प्रास्ताविक मधुन “सन्मान स्त्री शक्तीचा फाउंडेशन” यांच्या कार्यावीषयी माहीती दीली. गावातील विधवा महिलांना वाण देऊन आपल्या बोलण्यातुनच नाही तर कृतीतुन समाज बदल करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. त्यावेळी उपस्थीत महिलांनी आपल्या कला सादर केल्या. यावेळी कार्यक्रमाला उपस्थीत सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन च्या सदस्या वैशाली देठे, शारदा चिंतकुंटलवार,सुरेखा ढेंगळे,मीनाक्षी मोहीते,अर्चना पिदूरकर,वेणु झोडे व सजीता मोहुर्ले,गीता सोयाम,माधुरी टेकाम,प्रीया कोडापे,बेबीबाई सुरपाम,शोभा सोयाम,मंदा पेंदोर,शारदा पेंदोर गावातील सर्व महीला भगीणी,गावातील सरपंच, सर्व महीला बचत गट व युवक यांनी कार्यक्रमाचे आयोजन करुन सहकार्य केले.परिसरात एक आनंदाचे आणि महीला एकिकरणाचे वारे वाहू लागले. बेटी बचाओ बेटी पढाओ शपथ देऊन व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आता एक वादळ किरण देरकर,असे चिन्ह दिसायला लागले आहे