सैनिक पब्लिक स्कूलचा रिले क्रिडासंघ राज्यस्तरावर !

सहसंपादक : रामभाऊ भोयर

श्री सत्यसाई शिक्षण व प्रशिक्षण संस्था संचालित सैनिक पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज वडकी तालुका राळेगाव मधिल ४ विद्यार्थी १७ वर्ष वयोगटातील विभागस्तरिय अथेटिक्स रीलेरेस क्रिडा स्पर्धेत विजेते ठरले आहेत.या विद्यार्थ्यांचा संघ 11 ते 14 नोव्हेंबर 2024 बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेसाठी पात्र ठरलां आहे.

सदर विद्यार्थ्यांमध्ये सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथील इयता दहावी मधील तुषार सत्यपाल केराम, विवेक शंकर मेश्राम, तुषार सुभाष टेकाम व पुष्कर सुधाकर कोहचाडे या विद्यार्थ्यांचं समावेश आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष रणधीर सिंह दुहान, सचिव सत्यवान सिंह दुहान, प्रशासक भरत सिंह दुहान,प्राचार्य सचिन ठमके (Resource Person Of CBSE), क्रिडा विभाग प्रमुख राकेश सिंह दूहान, क्रिडा शिक्षक प्रा. जितेंद्र यादव यांचेसहित शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.