
दिव्यांग उमेश उईके यांचे डेलीनिड चे दुकान शॉर्ट सर्किट मुळे जळुन खाक झाले याला जबाबदार कोण? हा प्रश्न गंभीर आहे मनुष्यहानी झाली नाही परंतु दुर्घटना गंभीर होती परंतु दुकानातिल तिन ते चार लाख रुपयांचे सर्व साहित्य जळुन खाक झाले .* घरांत आईवडील म्हातारे लहान छोटे लेकरं आणि कर्ता पुरुष एक पाय नसलेले दिव्यांग उमेश सर्व साहित्य उसनवारीवर घेऊन उपजिवीका करण्यासाठी व्यवसाय उभा केला आणि अशी घटना घडली सरकारी पंचनामा झाला लोकप्रतिनिधींआजी / माजी आमदार यांनी तर ढुंकूनही पाहिले नाही.आम्ही जेव्हा घरी भेटायला गेलो तेव्हा उमेशची आई मानसिक दृष्ट्या खजुन होते डोळ्यात अश्रू होते. उमेश ला मदतिची आवश्यकता आहे. सरकारी मदत होणे आवश्यक आहे.लोकप्रतिनिनी मदत करणे आवश्यक आहे सामाजिक संघटना नी मदत करणे आवश्यक आहे.गोडवाना गणतंत्र पार्टी चे कार्याध्यक्ष मा बळवंतराव मडावी आणि मा मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी माणुसकी जिवंत असावी हा मार्ग स्विकारुण दहा हजार रुपयांची मदत त्यांना सुपुर्द केली आणि खचुन जावु नको हा आधार दिला मदतीचा हात देताना बळवंतराव मडावी साहेब, मधुसूदन कोवे गुरुजी हर्षल आडे आणि सौ वर्षा आडे तालुका अध्यक्ष राळेगाव हे हजर होते उमेश उईके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले
