वस्तीतील पोल देत आहे, अपघातास निमंत्रण !,तयार चोरी जाण्याची शक्यता बळावली !

सहसंपादक: रामभाऊ भोयर

   

राळेगाव तालुक्याअंतर्गत येत असलेल्या वडकी येथील बेघर वस्तीतील विद्यूतत सप्लाय व स्टेंशन तार नसलेले रिकामे पोल वाकले असून कधीही घरावर पडण्याची शक्यता बळावली आहे.

सविस्तर वृत्त असे की, सुमारे दोन वर्षांआधी वार्ड क्रमांक चार मधील बेघर वस्तीतील रहिवासी नागरीक आणि तालुकाअध्यक्ष शिवसेना प्रमुख मनोज भोयर ह्यांच्या पुढाकाराने वस्तीतून गेलेली 33 केव्ही विद्यूत लाईन हटविण्यात आली होती. परंतु अजूनपर्यंत उभे असलेले रिकामे पोल व गुंडाळी करून ठेवलेली तार अजुनपर्यंत महावितरणने नेली नसल्यामुळे तारा चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्टेंशन तार नसलेले पोल केव्हाही घरावर पडण्याची शक्यता आहे.
संभाव्य भिती लक्षात घेता उभे असलेले पोल व तार व इतर साहित्य वस्तीतून घेऊन जाण्याची विनंती वस्तीतील नागरिकांनी केली आहे.

   प्रतिक्रिया :-  

    

प्लॉटच्या मध्यभागी उभे पोल आहे. त्यांना स्टेंशन तार नसल्यामुळे पोल तिरपे झाले आहे. ते केव्हाही वाकून घरावर पडू शकतात. सोबतच, जमा करून ठेवून असलेले तारांचे गुंडाळे चोरीला जाण्याची पण भीती वाढली आहे.महावितरणला ही बाब लक्षात आणुन दिली होती.
भविष्यात अप्रिय घटना घडल्यास होणाऱ्या नुकसानीस महावितरण कंपनी जबाबदार असेन !
डॉ. व्ही. डी. कोवे
रहिवासी/वडकी

वस्तीतुन गेलेल्या विद्यूतत तारा हटविण्यात पक्षाच्या सहकार्याने त्रस्त असलेल्या वस्तीतील रहिवाशी नागरिकांना मोठा दिलासा देऊन न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्याही उपरांत रहिवासी नागरिकांना त्रास जर होत असेल तर मला पुढील कठोर पाऊल उचलावे लागेल, हे महावितरणने पक्के ध्यानात घ्यावे
.

   

मा. मनोज भोयर तालुका अध्यक्ष शिवसेनाप्रमुख ( शिंदे गट ) राळेगाव