
सहसंपादक : रामभाऊ भोयर
एस एस. सी बोर्ड परीक्षा 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून राळेगाव येथील नामांकित न्यू इंग्लिश हायस्कूल मधून एस . एस. सी. बोर्ड परीक्षेला एकूण 295 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.त्यापैकी 240 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकालाची टक्केवारी 94.91% असून राळेगाव तालुक्यातुन व शाळेमधून प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान कु. आकांक्षा कोहाड या विद्यार्थिनीला मिळाला असून तिला 96.40 टक्के गुण मिळाले आहे तर द्वितीय क्रमांक मोहित खेकारे 93.40 % मिळवून प्राप्त केला असून तृतीय क्रमांक अथर्व भोरे 93.0% गुण मिळविले आहे…तसेच कु. आकांक्षा राजेश कोहाड हिला गणित विषयांमध्ये 100 गुणांपैकी 100 गुण मिळाले. तर क्रिश विठ्ठलराव खेवले या विद्यार्थ्यांला विज्ञान विषयांमध्ये 100 गुणांपैकी 100 गुण प्राप्त झाले. एकंदरीत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुद्धा 10 वी च्या बोर्ड परीक्षा निकालात शाळेने राळेगाव तालुक्यात बाजी मारली असून शाळेत प्राविण्य श्रेणीत तब्ब्ल 51 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 91 प्रथम श्रेणीत विद्यार्थी पास झाले असून द्वितीय श्रेणीत 86 विद्यार्थी पास झाले असून तर तृतीय श्रेणीत 52 विद्यार्थी पास झाले असून शाळेच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागाचा परिसर पाहता 10 वी बोर्ड परीक्षेत विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली असून त्यामुळे विध्यार्थीचा या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी तालुक्यातील पालकाचा कल वाढला असून मागील सत्रात चालत शाळेत चालत असलेल्या सराव परीक्षा, अतिरिक्त तासिका व ईतर शालेय उपक्रम यासाठी महत्वाचे आहे. या निकालाचे, न्यू एज्युकेशन सोसायटी संस्थेचे अध्यक्ष बी. के. धर्मे, सचिव सौं.डॉ अर्चना धर्मे तसेच मुख्याध्यापक विजय कचरे, उपमुख्याध्यापक सुरेश कोवे, पर्यवेक्षक सूचित बेहरे तसेच संस्थेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले असून शाळेतील 10 बोर्ड परीक्षेच्या उत्कृष्ट निकाला बाबतीत समाजातील सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे….
