किरण कुमरे यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाची मतदार संघात चर्चा
[ महाविकास आघाडीत उमेदवार कोण राजकीय वर्तुळात चर्चा ]

सहसंपादक : रामभाऊ भोयर

काँग्रेस व महाविकास आघाडी द्वारे आयोजित 24 सप्टें.च्या जनआक्रोश मोर्चाला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.भर पावसात हजारो नागरिकांनी उपस्थित राहून महायुती शासनाच्या तुघलकी धोरणाचा निषेध केला. या मोर्चा चे नेतृत्व खा. संजय देशमुख यांनी केले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड प्रफुल मानकर माजी मंत्री प्रा. वसंत पुरके,यांचे सह महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी किरण कुमरे यांच्या समर्थनार्थ निघालेला मोर्चा चांगलाच गाजला.काँग्रेस इच्छुक असणारे महत्वाचे उमेदवार गायब होते. किरण कुमरे यांचा अपवाद वगळता अनेकांनी जनहिताच्या या महत्वाच्या मोर्चा कडे पाठ फिरवली. मतदार संघात याची चर्चा रंगली आहे.
प्रशासनाला विविध मागण्याचे निवेदन या वेळी देण्यात आले . कापसाला 10 हजार रु. क्विंटल भाव दया, सोयाबीन ची खरेदी केंद्र त्वरित सुरु करा आदी महत्वाच्या मागण्यासह शासनाच्या धोरणावर सडकून टीका करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या जागराकडे तालुक्याचे लक्ष लागले होते . याच मोर्चातुन विधानसभा उमेदवारारीचा मार्ग प्रशस्त होणार याची राजकीय जानकारांना कल्पना होती. गेल्या काही महिन्यापासुन राळेगाव विधानसभा मतदार संघात अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी करीता विविध फ़ंडे वापरास सुरुवात केली. जन आक्रोश मोर्चात हे सहभागी होतील अशी स्वाभाविक अपेक्षा होती त्यांनी रीतसर काँग्रेस पक्षा कडे उमेदवारीची मागणी देखील केली त्या मुळे त्यांनी उपस्थित राहणे संयुक्तीत देखील होते पण ते आले नाही त्यांना बोलावले नाही की त्यांना थांबवले याचा निश्चित उलगडा झालेला नाही. त्या मुळे तालुक्याच्या कार्यकर्त्यांपर्यंत जो मॅसेज गेला तो महत्वाचा आहे. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके नंतर किरण कुमरे हेच उमेदवारी च्या स्पर्धेत आहेत असा संदेश पद्धतशीर पणे या मोर्चा च्या निमित्ताने गेला.विशेष म्हणजे किरण कुमरे यांच्या साठी तालुक्यातुन महिलां भगिनीं, आदिवासी बांधव व सर्वसामान्य नागरीक आवर्जून उपस्थित होते. ‘गोर -गरिबांचा आमदार कोण,किरणभाऊ शिवाय दुसरा कोण ‘ असे नारे मोर्चा सुरु होण्याआधी जमलेल्या नागरिकांनी स्वयंप्रेरणेने दिले. शेवटी किरण कुमरे यांनीच या नागरिकांना आपल्याला शासनाच्या धोरणाचा निषेध करायचा आहे अशी समजूत काढून मोर्चात सहभागी करून घेतले. काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठता ही जशी प्रा. वसंत पुरके यांची जमेची बाजू आहे तशीच किरण कुमरे यांची देखील काँग्रेस एकनिष्ठता ही जमेची बाजू आहे. सर्व वरिष्ट नेत्याना ते चालतात. गेल्या अनेक वर्षा पासुन राळेगाव मतदार संघात समजसेवेचा वारसा त्यांच्या कडे आहे. शिक्षित युवक -युवती साठी मार्गदर्शन वर्ग,सामूहिक विवाह मेळावे, व जनतेसोबत थेट स्थानिक सपंर्क या त्यांच्या जमेच्या बाजू ठरतात.आदिवासी सेवक म्हणून त्यांना शासनाने सन्मानित केले हा एक अधिकचा प्लस पॉइंट. या मोर्चा निमित्ताने काँग्रेस तर्फे महाविकास आघाडीची उमेदवारी कुणाला मिळणार हे स्पष्ट होऊ लागल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतांना दिसते.
महाविकास आघाडीच्या दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते नवा चेहरा देण्याची मागणी करतांना दिसतात. मतदार संघात सातत्याने कार्यरत असणारा, काँग्रेस पक्षाशी जुळलेला उमेदवार हा निकष लावण्यात यावा अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी आहे. कृषी, वीज, आरोग्य, शिक्षण, शेतकरी आत्महत्या, कापसावर प्रक्रिया उद्योग या आघाडीवर मतदार संघात कोणतेही ठोस काम झालेले नाही.जन आक्रोश मोर्चात या साऱ्या बाबींवर प्रहार करण्यात आला. किरण कुमरे यांच्या साठी तालुक्यातील विविध गावातून महिला – पुरुष उपस्थित राहिले. जन आक्रोश मेळाव्याकरीता ही उपस्थिती महत्वाची ठरली.