जनावरांच्या लसीकरणा संदर्भात  शेतकऱ्यांना मार्गदर्शन…


राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225)

ग्रामीण व कृषी  कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मारोतराव वादाफळे कृषी  महाविद्यालय यवतमाळ येथील  विद्यार्थीनी शितल वासुदेव तोटे यांनी रावेरी गावामध्ये होत असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभाग  घेऊन जनावरांना लसीकरण  करून घेण्याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. यावेळी पशुवैद्यकीय  डॉ. नाळे व टीम यांनी लसीकरण केले. यावेळी शेतकऱ्यांना लंपी, घटसर्प, दुग्धज्वर इत्यादी रोगाबद्दल माहिती दिली तसेच  जनावरांच्या आहार  नियोजन संबंधित माहिती देण्यात आली.
    यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्या सह आदींचे  मार्गदर्शन लाभले.