
राळेगाव तालुक्यातील वरुड जहांगीर येथील मध्यम प्रकल्प झाल्याला तीस वर्षांच्या जवळपास कालावधी झाला त्या तलावा अंतर्गत येणारा भिंतीचा भाग आणि कालव्याची दुरुस्ती काही वर्षे करण्यात आली परंतु आता मात्र त्या तलावाला कोण कर्मचारी आहे कोण इंजिनियर आहे याचा मात्र काही पत्ता नसून त्या तलावाच्या भिंतीला झाडेझुडपे वाढल्याने जंगलाचे स्वरूप प्राप्त झाले असून सोबतच वरूड जहांगीर प्रकल्पापासून जाणारा कालवा ( कॅनाल ) चा दोन्ही बाजूंनी झाडाझुडुपांनी वेढलेला असून अनेक ठिकाणी पाणी सुद्धा अस्ताव्यस्त जात आहे. अगोदरच शेतकरी निसर्गाच्या अवकृपेमुळे धास्तावले असून सोबतच शेतकऱ्यांना आलेले नापिकिचे संकट सुद्धा भोवती फिरत असून अशातच राहिलेला पिकाचा भाग शेतकऱ्यांच्या हातात येण्याअगोदर जंगली जनावरे फस्त करत असून या संकटाला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात रात्रीबेरात्री फिरायचे कसे हा प्रश्न उपस्थित झाला असून मागील अनेक वर्षांपासून या परिसरात , जंगलात वाघाचा वावर वाढला असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात जाण्यासाठी हिम्मत करायची कशी हा प्रश्न निर्माण झाला असून अशातच या पाटबंधारे विभागाचे साफसफाईकडे झालेले दुर्लक्ष निश्चितच शैतकऱ्यावर आणलेले संकट म्हणायला हरकत नाही.अशातच मात्र या गोष्टीं मध्यम प्रकल्प पाटबंधारे विभागाला माहिती नाही कि काय काही समजायला मार्ग नाही. या अगोदर सुद्धा सारजा नावाच्या प्राण्यानी भि़तीला पोखरले होते तेव्हा त्यांना कळविण्यात आले तेव्हा दुरुस्ती करण्यात आले मात्र या साफसफाई बाबत बातमी मागे एकदा प्रकाशित करून सुद्धा लक्ष दिले नाही.करीता सन्माननीय आमदार प्राचार्य डॉ अशोक ऊईके सरांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा विषय मार्गी लावावा अशी मागणी वरुड जहांगीर येथील शेतकरी श्रावनसिंग वडते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
